अग्गंबाई सासूबाई..! प्रियंका चोप्राची सासू तिच्यापेक्षा दिसते लयभारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 12:36 PM2021-07-27T12:36:14+5:302021-07-27T12:36:36+5:30

प्रियांकाची सासू म्हणजेच डेनिस मिलर जोनास तिच्यापेक्षाही सुंदर असल्याचे अनेक नेटीझन्सचे म्हणणे आहे.

Aggambai Sasubai ..! Priyanka Chopra's mother-in-law looks more rhythmic than her | अग्गंबाई सासूबाई..! प्रियंका चोप्राची सासू तिच्यापेक्षा दिसते लयभारी

अग्गंबाई सासूबाई..! प्रियंका चोप्राची सासू तिच्यापेक्षा दिसते लयभारी

Next

बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.  २००० साली प्रियांकाने ‘मिस वर्ल्ड’ हा किताब पटकावला आणि तिला बॉलिवूडच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. २००३ साली ‘द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ या स्पाय’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिने पदार्पण केले.  २००३ साली अंदाज चित्रपटातील तिच्या भूमिकेने तिला त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

प्रियांकाने हॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले. तिथे देखील आपल्या अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर तिने नाव कमावले. तिने गायलेल्या इंग्रजी गाण्यांचा अल्बमही बराच गाजला.

२०१८ साली तिने हॉलिवूडमधील गायक, गीतकार आणि अभिनेता निक जोनास बरोबर लग्न केले. सध्या ती त्याच्यासोबत न्यूयॉर्कमध्येच राहते.

प्रियांकाने हॉलिवूडमध्ये एन्ट्री केली असली तरी तिचे चाहते जगभर आहेत. प्रियंकाच्या सौंदर्याचे जगभरात चाहते आहेत. मात्र तिची सासूदेखील दिसायला खूप सुंदर आहे.

प्रियांका आणि निक च्या सोशल मीडिया पोस्ट्समधून आपण तिच्या सासूला पाहिले आहे. फोटो पाहिले असता आपल्या लक्षात येईल की प्रियांकाची सासू म्हणजेच डेनिस मिलर जोनास खूपच सुंदर दिसते. ती प्रियांका पेक्षाही सुंदर असल्याचे अनेक नेटीझन्सचे म्हणणे आहे.

मूळच्या टेक्ससच्या असलेल्या डेनिस यांचे निकचे वडील गायक पॉल केविन जोनास यांच्यासोबत १९८७ साली लग्न झाले. त्यावेळी डेनिस केवळ १९ वर्षांच्या होत्या. २१ व्या वर्षी त्यांनी आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला. निकच्या जन्माच्या वेळी त्या केवळ २६ वर्षांच्या होत्या. 

Web Title: Aggambai Sasubai ..! Priyanka Chopra's mother-in-law looks more rhythmic than her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app