कलाकार अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात. तिच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही.  नेहमीच तिच्या वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोमुळे इतरांना प्रेरणा देत असते.  तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी ओलांडली आहे. या वयातही  मंदिरा बेदीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे.  

 

तिचा एक नवीन फोटो समोर आला आहे. मंदिरा ही चोखदंड आहे. ती जे काही करते त्यात काही ना काही खासियत असतेच. तिचा व्हायरल झालेल्या फोटोत याची प्रचिती येईल. फोटोत ती स्विमिंग करत  करताना पाहायला मिळत आहे. स्विमसूटमध्ये मंदिराचा अंदाज पाहून सारेच तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटस करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना कमालीचा आवडला असून काहीच तासांत या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत.  उत्तम आरोग्याचा कानमंत्र देणा-या मंदिराने नवीन वर्षात काही तरी वेगळं करण्याचं ठरवलंय.मात्र त्यासाठी तिच्या फॅन्सना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 


सोशल मीडियावर नजर टाकली तर तुम्हाला मंदिराचे विविध अंदाजात कॅप्चर झालेले फोटो पाहायला मिळतील. बिकनीमधील फोटोंनी तर सोशल मीडियावर अक्षरक्षः धुमाकुळ घातल्याचे पाहायला मिळते. मंदिराने 1999 मध्ये निर्माता राज कौशलसोबत लग्न केले. लग्नानंतर 12 वर्षांनी मंदिराला मुलं झाली. मंदिराने पुढे सांगितले की, माझ्या सिनेमाच्या कमिटमेंटसनी मला प्रेग्नेंट होऊ दिले नाही. मला भीती होती की जर मी प्रेग्नेंट राहिले तर माझं करिअर संपेल. माझ्या पतीमुळे आमचा संसार यशस्वी होऊ शकला. नुकतीच मंदिरा प्रभासच्या साहोमध्ये दिसली होती. यात तिची नेगेटीव्ह शेड् असलेली भूमिका होती.


मंदिरा बेदीने नव्वदच्या दशकातील मालिका शांतीमध्ये एका स्वावलंबी महिलेची भूमिका साकारून लोकप्रिय झाली होती. याशिवाय तिने 'दिलवाले दुल्हनिया ले जाएगें' सिनेमातही काम केले होते. या सिनेमाक तिने साकारलेली भूमिका आजही रसिकांच्या लक्षात आहे.

Web Title: At the age of 46, Mandira Bedi is raising the heat in hot bikini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.