हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकालाच हिमालयाएवढं यश किंवा लोकप्रियता मिळत नाही. मोजक्या कलाकारांनाच ते कसब उत्तमरित्या जमतं. ते बराच काळ रसिकांच्या गळ्यातले ताईत बनून राहतात. मात्र काही कलाकार चित्रपटसृष्टीत कधी येतात आणि कधी जातात तेही कळत नाही. काहींना सुरूवातीच्या काळात यश मिळतं, नंतर मात्र ते कुठे जातात हे कळत नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे शमिता शेट्टी, शमिताही शिल्पा शेट्टीची बहिण अशी तिची ओळख.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी वयाची पस्तीशी, चाळिशी ओलांडली आहे, पण अद्याप त्यांनी लग्नाचा विचार न करता सिंगलच राहणे पसंत केले आहे.  या यादीत तब्बू, अमिषा पटेल, तनिषा मुखर्जीसह अनेक अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे. या सर्वजणी अद्याप सिंगल असून त्यांचे आयुष्य एन्जॉय करतायेत.

मात्र आता शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टीला लग्न करण्याची इच्छा आहे. शमिता शेट्टी ४2 वर्षाची असून तिने अजूनतरी लग्न करण्याचा विचार केला नव्हता. मात्र वारंवार विचारल्या जाणा-या प्रश्नामुळे शमिताने थेट माझ्यासाठी कोणीतरी लग्नासाठी चांगला मुलगा शोधा असे सांगत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

दिलेल्या एका मुलाखतीत शमिताने म्हटले होते की, “मला लग्न तर करायचं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मी लग्नाची तयारी केली आहे. पण माझा होणारा नवरा कुठे आहे हेच मला माहित नाही. मला अशा व्यक्तीसोबत लग्न करायचंय ज्याच्यासोबत मी आयुष्यभर आनंदी राहू शकेन. असा कुठलाही व्यक्ती मला अद्याप भेटलेला नाही. तुमच्याकडे कोणी असा व्यक्ती असेल तर मला सांगा.”

शमिताने 2001 मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ‘मोहब्बतें’ या ब्लॉकबस्टर सिनेमाद्वारे तिने आपल्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. या सिनेमासाठी तिला आयफाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. त्याच वर्षी तिचे 'शरारा शरारा' हे गाणे आले.

या गाण्यामुळे शमिता एक रात्रीत स्टार झाली. 2005 मध्ये रिलीज झालेल्या ‘जाहरा’ सिनेमात शमिताच्या कामाला चांगलीच पसंती मिळाली होती. सिनेमाद्वारे शमिताने इंटिरियर डिझायनिंग क्षेत्रात नाव कमावले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: At the age of 42, Shilpa Shetty's sister Shamita Shetty Want To Married and said, "Someone find a husband for me."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.