जान्हवी कपूरवर पुन्हा एकदा नेटक-यांनी निशाणा साधला आहे. यावेळी नेटीझन्स तिची खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण वाचुन तुम्हालाही हसू आवरणे अशक्य होईल. मीडियाचे कॅमेरे दिसताच जान्हवी मस्त पोज देत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र यावेळी आणखीन एक गोष्ट कॅमे-यात कैद झाली आहे. 


ती म्हणजे जान्हवीने जो ड्रेस घातला होता. त्या ड्रेसचा प्राइज टॅग जान्हवी काढायला विसरली आणि तो तसाच राहिला. त्यामुळे नेटीझन्स हा व्हीडीओ पाहून हसून हसून लोटपोट होत आहेत. जान्हवी या ड्रेसमध्ये अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस दिसत असली तरी ड्रेसवर घेतलेल्या ओढणीचा प्राइज टॅग सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या प्राइज टॅग असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जर तुम्ही श्रीदेवीचे चाहते असाल तर तुमच्या लक्षात असेल की तिच्याकडेदेखील पांढऱ्या रंगाची मर्सिडिज होती. या गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबर प्लेटवर MH 02 DZ 7666 लिहिलं होतं.

 

श्रीदेवीला या नंबरच्या गाडीतून पती बोनी कपूर, मुली खुशी व जान्हवीसोबत ट्रॅव्हल करताना पाहिले होते. जान्हवी नेहमी सांगते की, तिला कशाप्रकारे आईची आठवण येते आणि तिने आईच्या गाडीची नंबर प्लेट बनवून आईला सदैव सोबत ठेवण्याची पद्धत वापरली आहे.

आगामी काळात  ती गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल व रूही अफ्जा या चित्रपटात झळकणार आहे. या व्यतिरिक्त ती करण जोहरचे मोठे सिनेमे दोस्ताना २, बॉम्बे गर्ल व तख्तमध्ये देखील झळकणार आहे.

Web Title: Again Janhvi Kapoor Troll; Because She wearing dupatta with price tag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.