काही दिवसांपूर्वी वेबसिरीजमध्ये दिसलेला हा अभिनेता पुन्हा एकदा बॉलिवूडकडे वळला आहे. जंगल क्राय चित्रपटात तो झळकणार आहे. आम्ही बोलतोय अभिनेता अभय देओलबाबत. जंगल फ्रायमध्ये तो रग्बी कोच रुद्राक्ष जिनाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाची स्क्रीप्ट शूटच्या आधी दोन बदलण्यात आल्याचं बोललं जातं आहे.


जंगल क्राय चित्रपटाचे निर्माते प्रशांत शाह यांनी देव आनंद, शाहरुख खान, करण जोहर आणि राकेश रोशन सारख्या अनेक दिग्गजांसोबत त्याने बर्‍याच वर्षांत काम केले.


प्रशांत शाह म्हणतात, ''जेव्हा स्क्रिप्ट माझ्याकडे निर्माते शब्बीर बॉक्सवाला यांनी आणली होती. त्यामुळे मी कलिंगा इन्स्टिट्यूटला (केआयएसएस) भेट दिली आणि वर्ल्डकप जिंकलेल्या मुलांना भेटलो. माझ्या निरीक्षणाच्या आधारावर आम्ही आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या अनुषंगाने स्क्रिप्ट पुन्हा लिहिली. शेवटी, आम्हाला दिग्दर्शित करण्यासाठी सागर बॅलरी मिळाला. ''


ते पुढे म्हणाले, “मी जसे उद्योगातील अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे आणि त्यांनी माझ्याबरोबर काम केले आहे. या कारणामुळे मला क्रिएटीव्ह चित्रपटाची निर्मिती व्यावसायिक पैलूमध्ये कसे रूपांतरीत होते हे माहित आहे.  मला एक कथाकार म्हणवून घ्यायला जास्त आवडते. म्हणूनच मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या दृष्टीनुसार माझा पहिला चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला”.
निर्माते प्रशांत शाह लवकरच “जंगल क्राय” या चित्रपटाचे निर्मात्याच्या रूपात पहिल्या बिग बजेट प्रोजेक्टसह येणार आहेत. आदिवासी मुलांवर आधारित चित्रपट आहे, जे अच्युता समांताच्या मदतीने आंतरराष्ट्रीय खेळात प्रवेश करण्यास यशस्वी होतात.  "कलिंग इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स" ची संस्थापक समांता ज्यांनी विनामूल्य 30,000 मुलांना शिक्षण, भोजन, निवास आणि कपडे प्रधान केले. या चित्रपटात पॉल वॉल्श नावाचे वर्णन करणारे परदेशी ऍक्टर स्तुवर्ट व्रईट (पीपल लाईक अस) ला पण बघायला भेटणार. पॉल वॉल्श ने कलिंगा इन्स्टिटयूट मध्ये रग्बी या खेळाचा मुलांशी परिचय केला आणि कोच रुद्राक्ष जिना यांच्या अभिनय अभय देओल यांनी केले आहेत. हा चित्रपट भारत ते लंडन प्रवास करीत आहे, या चित्रपटात आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकार अभिनेते ज्युलियन लुईस जोन्स (इनव्हिक्टस) आणि रॉस ओ हेनेसी ( गेम ऑफ थ्रोन्स) आहेत.


या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट रिलीज होणार आहे. तिथे एमिली शाह बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत असून या चित्रपटात फिजिओथेरपिस्टची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Web Title: After the webseries, Abhay deol will seen in bollywood movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.