बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशनने गतवर्षी ‘सुपर 30’ व ‘वॉर’ या सुपरहिट सिनेमांसह बॉक्स ऑफिसवर धमाकेदार वापसी केली. त्याआधी दीर्घकाळ हृतिक रूपेरी पडद्यापासून दूर होता. ‘सुपर 30’ व ‘वॉर’ या सिनेमांच्या बॉक्स ऑफिसवर हीट ठरले. 


आता त्याला संजय लीला भन्साळी, आनंद राय, फराह खान, आदित्य चोप्रा, करण जोहर आणि साजिद नाडियाडवाला यांच्यासह देशातील जवळजवळ प्रत्येक मोठ्या चित्रपट निर्मात्याची ह्रतिक पहिली चॉईस ठरला आहे.हीट सिनेमा दिल्यानंतर ह्रतिकने आपल्या मानधनात चांगलीच वाढ केली आहे. नेमकी ही वाढ किती झाली ते अद्याप कळलेले नाही.


लवकरच तो धर्मा प्रॉडक्शनच्या एका आगामी स्पाय थ्रीलर सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा नितीन गोखले यांच्या ‘R.N. Kao: Gentleman Spymaster’ या पुस्तकावर आधारित असल्याचे कळतेय. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने काही दिवसांपूर्वीच या पुस्तकाचे हक्क खरेदी केले. खुद्द करणने याबाबतची घोषणा केली होती. हा सिनेमा रिअल लाईफ इंडियन स्पायमास्टर रामेश्वर नाथ काव यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. रामेश्वर नाथ यांनी भारताच्या ‘रॉ’ या गुप्तहेर संघटनेची पायाभरणी केली.

Web Title: After war and super30 hrithik Roshan becomes expensive actor in bollywood industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.