after thugs of hindostan flop aamir khan start preparation for ghajini sequel | ‘ठग्स’ फ्लॉप होताच, आमिर खानने ‘गजनी 2’साठी कसली कंबर!
‘ठग्स’ फ्लॉप होताच, आमिर खानने ‘गजनी 2’साठी कसली कंबर!

ठळक मुद्देटायटल रजिस्टर झाल्यानंतर ‘गजनी 2’ची प्लानिंग होतेय, हे नक्की. हा चित्रपट कोण दिग्दर्शित करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ‘गजनी’ हा चित्रपट ए. आर. मुरगदास यांनी दिग्दर्शित केला होता. आता ‘गजनी 2’ कोण दिग्दर्शित करणार, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान ९० च्या दशकातील सर्वाधिक यशस्वी अभिनेता आहे. कदाचित याचमुळे आमिरच्या चित्रपटांचे तिकिट खरेदी करण्यापूर्वी प्रेक्षक एकदाही विचार करत नाही. अर्थात गतवर्षी आलेल्या आमिरच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाने प्रेक्षकांची प्रचंड निराशा केली. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना अपार अपेक्षा होत्या. पण ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ प्रदर्शित झाला आणि या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ फ्लॉप झाल्यावर आमिरने प्रेक्षकांची माफी मागितली, ती याचमुळे आणि कदाचित याचमुळे आमिरला पुन्हा एकदा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ची पुनरावृत्ती करायची नाही. याच आधारावर आमिरने एक मोठा निर्णय घेतला आहे.


होय, ताजी खबर मानाल तर ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’नंतर आमिर बॉक्स ऑफिसवर दमदार वापसी करू इच्छितो. साहजिकचं यासाठी त्याला तेवढाच दमदार चित्रपट हवा असणार आहे. तर तो चित्रपट आमिरला मिळाला आहे. डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, आमिरने ‘गजनी 2’ची तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आमिर आपल्या शरिरावर प्रचंड मेहनत घेतोय. ही कदाचित ‘गजनी 2’ची तयारी असावी, असे मानले जात आहे.
केवळ इतकेच नाही तर  ‘गजनी’च्या मेकर्सनी अलीकडे ‘गजनी 2’ हे टायटल रजिस्टर केले आहे. हिंदी आणि तेलगू भाषेत हे टायटल रजिस्टर करण्यात आले आहे. ‘गजनी’ एक यादगार चित्रपट होता. आजही कुणी एखादी गोष्ट विसरली की, तुझा ‘गजनी’ झालाय, असे म्हटले जाते, यावरून या चित्रपटाच्या लोकप्रीयतेची कल्पना यावी.


तूर्तास तरी टायटल रजिस्टर झाल्यानंतर ‘गजनी 2’ची प्लानिंग होतेय, हे नक्की. हा चित्रपट कोण दिग्दर्शित करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ‘गजनी’ हा चित्रपट ए. आर. मुरगदास यांनी दिग्दर्शित केला होता. आता ‘गजनी 2’ कोण दिग्दर्शित करणार, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

English summary :
Aamir has started preparing for 'Ghajini 2'. For the past few days, Aamir has been working hard on his body. It is believed that 'Ghajini 2' may be ready. Gajani's Makers has recently registered the title 'Ghazni 2'. This title has been registered in Hindi and Telugu languages. 'Ghajini' was a memorable movie.


Web Title: after thugs of hindostan flop aamir khan start preparation for ghajini sequel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.