after telecast of ramayan people trolled swara bhasker says she is manthara of kalyug-ram | म्हणे कलयुगातील मंथरा...! स्वरा भास्करची का होतेय ‘मंथरा’सोबत तुलना?

म्हणे कलयुगातील मंथरा...! स्वरा भास्करची का होतेय ‘मंथरा’सोबत तुलना?

ठळक मुद्देअद्याप स्वराने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश ठप्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लोकांना घरी बसण्याचे आवाहन करण्यात येत आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी सरकार वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून लॉकडाऊनमुळे घरी बसलेल्या लोकांच्या मनोरंजनासाठी सरकारने रामायण, महाभारत यासारख्या लोकप्रिय मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. पण तूर्तास रामायण या मालिकेमुळे बॉलिवूडची एक अभिनेत्री अतिशय वाईट पद्धतीने सोशल मीडियावर ट्रोल होतेय. ही अभिनेत्री कोण तर स्वरा भास्कर.

खरे तर ट्रोलिंग स्वरा भास्करसाठी नवे नाही. आपल्या परखड स्वभावामुळे आणि एका विशिष्ट राजकीय भूमिकेमुळे स्वरा कायम ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. पण आता काहीही कारण नसताना रामायणच्या पार्श्वभूमीवर नेटक-यांनी स्वराला ट्रोल केले आहे.

 होय, रामायणातील राणी कैकयीची दासी मंथरा हिच्यासोबत स्वरा भास्करची तुलना केली जात आहे. अनेक नेटक-यांनी तिला आधुनिक भारतातील ‘मंथरा’ म्हटले आहे.
मंगळवारी सकाळपासून  राणी कैकयी आणि तिची दासी मंथरा हे रामायणातील दोन पात्र सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले. यानंतर लोकांनी मंथरासोबत स्वरा भास्करची तुलना करणे सुरु केले.
याआधी अनेकदा स्वरा तिच्या ट्विटमुळे ट्रोल झाली. पण कदाचित पहिल्यांदा कुठल्याही ट्विटशिवाय, कुठल्याही वादग्रस्त विधानाशिवाय स्वराला ट्रोल केले गेले.
अद्याप स्वराने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. मंथरासोबत होत असलेल्या तुलनेवर ती काहीही बोललेली नाही. अशात स्वरा यावर काय उत्तर देते, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

Web Title: after telecast of ramayan people trolled swara bhasker says she is manthara of kalyug-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.