बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वात कलाकारांच्या अकाली निधनाने सा-यांनाच जबर धक्का बसला आहे. त्यात करिअर ऐन भराच असताना सुशांतच्या आत्महत्येमुळे अजूनही लोक त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. तितक्यात कन्नड टीव्ही अभिनेता सुशील गौडानेही आत्महत्येमुळे शोककळा पसरली आहे. 

कन्नड इंडस्ट्रीमध्ये नावारूपास येण्यासाठी सुशील प्रयत्नशील होता.  त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याच्या अशा अचानक एक्झिटने  मनोरंजन विश्व, त्याचे चाहते आणि कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. त्याने 'अंतपूरा' या रोमँटिक मालिकेमध्ये काम केले होते. सुशीलने 7 जुलै रोजी आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले. 

संपूर्ण देश सध्या अनेक गोष्टींच्या तणावात आहे. सुशील गौडासारखा अभिनेता आत्महत्येच्या वृत्ताने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या डोळ्यांसमोर एखादा तरुण आणि हुशार अभिनेता आत्महत्या करतो, ही खूप वाईट आणि दु:खद घटना आहे.

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After Sushant Singh Rajput, TV actor Susheel Gowda dies by suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.