After kriti sanon jacqueline fernandez joins akshay kumar starrer bachchan pandey | क्रिती सनॉननंतर अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'मध्ये जॅकलिन फर्नांडिसची धमाकेदार एंट्री

क्रिती सनॉननंतर अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'मध्ये जॅकलिन फर्नांडिसची धमाकेदार एंट्री

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, अक्षय कुमार आणि क्रिती सनॉनच्या बच्चन पांडेमध्ये अर्शद वारसीची एंट्री झाली आहे. आता बातमी येतंय  चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये आणखी एक मोठे नाव जोडले गेले आहे. या चित्रपटात एका नाही तर 2 हिरोइन्सची गरज आहे. आता जॅकलिनलाही या सिनेमासाठी साइन केले गेले आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून जॅकने स्वत: ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. 

 'बच्चन पांडे' मध्ये क्रिती पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. पण जॅकलिनच्या व्यक्तिरेखेबद्दल अजून काही समोर आले नाही. सिनेमाच अक्षय कुमार एका गँगस्टरची भूमिका साकारणार आहे. सिनेमाचे शूटिंग 6 जानेवारीपासून राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सुरू होणार असून शूटिंग सलग 2 महिन्यांत पूर्ण करण्यात येईल.

हा सिनेमा अ‍ॅक्शन आणि कॉमेडीने भरलेला असेल.  'बच्चन पांडे'ची निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहेत. जॅकलिन सध्या 'भूत पोलिस'च्या शूटिंगसाठी धर्मशालामध्ये आहे. या सिनेमात तिच्यासोबत सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय ती रोहित शेट्टीच्या सर्कसमध्ये रणवीर सिंगसोबत झळकणार आहे. हा सुपरहिट सिनेमा 'अंगूर'चा रिमेक आहे.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After kriti sanon jacqueline fernandez joins akshay kumar starrer bachchan pandey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.