After Janhvi Kapoor, Jacqueline Fernandes bought a house in Mumbai, doing her own interior designing. | जान्हवी कपूर पाठोपाठ जॅकलिन फर्नांडिसने खरेदी केलं मुंबईत घर, स्वत:च करतेय इंटिरियर डिझायनिंग

जान्हवी कपूर पाठोपाठ जॅकलिन फर्नांडिसने खरेदी केलं मुंबईत घर, स्वत:च करतेय इंटिरियर डिझायनिंग

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे शेड्यूल  2021मध्ये व्यस्त असणार आहे. काही महिन्यांपूर्वी तिने 'भूत पोलिस'चे शूटिंग सुरु केलं आहे. यात तिच्यासोबत  सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच रणवीर सिंगसह रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ आणि अक्षय कुमार 'बच्चन पांडे'मध्येही ती झळकणार आहे. यासह, जॅकलिन फर्नांडिसच्या पर्सनल लाईफमध्ये ही बरेच काही सुरू आहे.

न्यूज 18च्या रिपोर्टनुसार, जॅकलिनने अलीकडेच  मुंबईत स्वत: साठी नवीन घर विकत घेतले आहे. गेल्या महिन्यात ती तिच्या नवीन अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली. आधीच्या घरापेक्षा जॅकचे नवं घरं प्रशस्त आहे. शूटिंगसोबतच  ती स्वत: च घराचे इंटिरियर डिझायनिंग करते आहे. 


जॅकलिन ही मुळची श्रीलंकेची आहे.जॅकलिन तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिच्या ग्लॅमरस अदा, बोल्ड लूक यामुळे भारतामध्ये तिचे अनेक चाहते आहेत.  तिने आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात २००९ मध्ये ‘अलादीन’ पासून केली होती. यात तिच्या सोबत रितेश देशमुख आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर ‘मर्डर 2’ मध्ये इमरान हाशमीसोबत दिसली होती. जॅकलिन आज बॉलिवूडवर राज्य करत आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After Janhvi Kapoor, Jacqueline Fernandes bought a house in Mumbai, doing her own interior designing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.