after hearing about saif ali khans marriage to kareena amrita singh called this man sara ali khan revealed | करिना-सैफच्या लग्नाबद्दल ऐकून अमृता सिंगने सर्वप्रथम या व्यक्तिला केला होता फोन, कारण ऐकून व्हाल Shocked

करिना-सैफच्या लग्नाबद्दल ऐकून अमृता सिंगने सर्वप्रथम या व्यक्तिला केला होता फोन, कारण ऐकून व्हाल Shocked

ठळक मुद्देकरिना व सैफच्या प्रेमकहाणीची सुरुवात टशच्या सेटवर सुरु झाली होती. यानंतर दोघांनी काही चित्रपटात एकत्र काम केले आणि 2012 मध्ये लग्नाचा निर्णय घेतला.

बेगम करिना कपूर खान आणि बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान  दुसºयांना आईबाबा होणार आहेत. होय, बेबो दुसºयांदा प्रेग्नंट आहे. सैफचे हे दुसरे लग्न हे सर्वांना ठाऊक आहेच. करिनाआधी सैफने स्वत:पेक्षा 12 वर्षे मोठ्या अमृता सिंगसोबत लग्न केले होते. विशेष म्हणजे, सैफ व अमृताच्या लग्नात करिना हजर होती. तेव्हा ती केवळ 12 वर्षांची होती. लग्नानंतर 13 वर्षांनी अमृता व सैफचा घटस्फोट झाला आणि कालांतराने सैफच्या आयुष्यात बेबोची एन्ट्री झाली.


करिनाने म्हटले होते मुबारक हो सैफ अंकल...

अमृता व सैफच्या लग्नात करिना तिच्या कुटुंबासोबत पोहोची होती. मुबारक हो अंकल.... अशा शब्दांत 12 वर्षांच्या करिनाने सैफला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यावर थँक्यू बेटा, असे सैफ म्हणाला होता. सैफला लग्नाच्या शुभेच्छा देणारी हीच करिना पुढे सैफची बेगम बनेल, याची कल्पनाही तेव्हा कुणी केली नसेल.

अमृताला कळले तेव्हा काय झाले...

करिना व सैफच्या प्रेमकहाणीची सुरुवात टशच्या सेटवर सुरु झाली होती. यानंतर दोघांनी काही चित्रपटात एकत्र काम केले आणि 2012 मध्ये लग्नाचा निर्णय घेतला. या लग्नाबद्दल सैफची पहिली पत्नी अमृता सिंगला कळले, तेव्हा तिने सर्वप्रथम काय केले माहितीये? तिने सर्वात आधी बॉलिवूडची सुप्रसिद्ध डिझाईनर जोडी अबू जानी व संदीप खोसला यांना फोन केला. एका मुलाखतीत अमृताची लेक सारा अली खानने स्वत: हा खुलासा केला होता. साराने सांगितले होते की, ‘करिना व अब्बू लग्न करणार आहेत हे ऐकल्याबरोबर अम्मीने सर्वात आधी अबू जानी व संदीप खोसला यांना फोन केला होता. सैफ लग्न करतोय आणि माझी अशी इच्छा आहे की, माझी मुलगी साराने या लग्नात सर्वात सुंदर लहंगा घालावा, ’ असे ती त्यांना म्हणाली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: after hearing about saif ali khans marriage to kareena amrita singh called this man sara ali khan revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.