after dil chahta hai now aamir khan to reunite with saif ali khan for the hindi remake of tamil film vikram vedha | तब्बल 19 वर्षांनंतर एकत्र दिसणार ‘दिल चाहता है’ची ही जोडी
तब्बल 19 वर्षांनंतर एकत्र दिसणार ‘दिल चाहता है’ची ही जोडी

ठळक मुद्दे  आमिर खान मोस्ट वाँटेड गँगस्टरची भूमिका साकारेल तर सैफ अली खान या चित्रपटात आर माधवनने केलेल्या भूमिकेत दिसेल. 

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने एका नव्या प्रोजेक्टची तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात आमिरसोबत सैफ अली खान दिसणार आहे. होय, तब्बल 19 वर्षांनंतर आमिर व सैफ  ही जोडी स्क्रिन शेअर करणार आहे.
2001 साली आलेल्या ‘दिल चाहता है’ या सुपरडुपर हिट चित्रपटात आमिर व सैफ यांनी एकत्र काम केले होते.  या सिनेमातील या दोघांची जोडी प्रेक्षकांना कमालीची भावली होती. आता ही जोडी एका तामिळ चित्रपटाच्या रिमेकच्या निमित्ताने एकत्र येणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘विक्रम वेधा’. 
तामिळ चित्रपट ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट सुपरहिट झाला होता. आर माधवन व विजय सेतुपथ या तामिळ चित्रपटात लीड रोलमध्ये होते. आता याच्या हिंदी रिमेकमध्ये आमिर व सैफ दिसतील.  आमिर खान मोस्ट वाँटेड गँगस्टरची भूमिका साकारेल तर सैफ अली खान या चित्रपटात आर माधवनने केलेल्या भूमिकेत दिसेल. 


 आमिर आणि सैफच्या या आगामी चित्रपटाचे नाव अजून ठरलेले नाही.  आमिर खान सध्या ‘लाल सिंग चड्ढा’ च्या स्क्रिप्टवर काम करत आहे. त्याचा हा चित्रपट पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे. तर दुसरीकडे सैफ सध्या ‘जवानी जानेमन’ आणि ‘तांडव’ या चित्रपटांमध्ये बिझी आहे. 

अशी असेल कथा
‘विक्रम वेधा’ची कथा इन्स्पेक्टर विक्रमच्या अवतीभवती फिरते. इन्स्पेक्टर विक्रम वेधा नावाच्या गँगस्टरला पकडण्याची योजना तयार करतो. वेधा आत्मसमर्पण करतो. पण यानंतर विक्रमला तीन कथा ऐकवतो आणि विक्रमची योग्य-अयोग्य ठरवण्याची विचारशक्तीच संपवतो.
 
 

English summary :
Aamir and Saif ali khan had worked together in the super-duper hit film 'Dil Chai Hai'. Now the duo will be teaming up for a remake of a Tamil film. The film is titled 'Vikram Vedha'.


Web Title: after dil chahta hai now aamir khan to reunite with saif ali khan for the hindi remake of tamil film vikram vedha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.