After Deepika Padukone, Shahid Kapoor will also be seen in Madame Tussauds | दीपिका पादुकोणनंतर आता शाहिद कपूरही दिसणार मॅडम तुसादमध्ये, शेअर केला फोटो

दीपिका पादुकोणनंतर आता शाहिद कपूरही दिसणार मॅडम तुसादमध्ये, शेअर केला फोटो

ठळक मुद्देशाहिदला हे वर्ष खूप लकी ठरल्याचे बोलले जात आहे. सध्या तो 'बत्ती गुल मीटर चालू'च्या शूटिंग मध्ये बिझी आहे

बॉलिवूड सेलिब्रेटींचे स्टॅच्यू सध्या एका-मागोमाग एक मॅडम तुसाद म्युझियम लावण्यात येते आहेत. नुकताच दीपिका पादुकोणचा स्टॅच्यू लागणार आहे त्यानंतर आणि शाहिद कपूर  मॅडम तुसाद म्युझियम जाणार आहे. शाहिदने एक फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शनदेखील दिले आहे की, 'लवकरच येतोय...लक्ष ठेवा.'  मात्र शाहिदचा हा स्टॅच्यू कधी बनणार याबाबतची आणखीन काही माहिती मिळू शकलेली नाही. याआधी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, ऐश्वर्या राय, करिना कपूर, कतरिना कैफ, सचिन तेंडुलकर, माधुरी दीक्षित, हृतिक रोशन यांसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींचे स्टॅच्यू आहेत.

 

 


शाहिदला हे वर्ष खूप लकी ठरल्याचे बोलले जात आहे. जानेवारी महिन्यात त्याचा बहुचर्चित सिनेमा 'पद्मावत' प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती. या चित्रपटात त्याने महाराजा रतन सिंगची भूमिका केली होती आणि या भूमिकेचे सगळीकडून खूप कौतूक झाले होते. सध्या तो 'बत्ती गुल मीटर चालू'च्या शूटिंग मध्ये बिझी आहे. सिनेमाचे बरेचसे शूटिंग उत्तराखंडमध्ये करण्यात आले आहे. ‘बत्ती गुल मीटर चालू’ हा सिनेमा वीज चोरीवर आधारित आहे.  वीज कंपनीच्या पायऱ्या झिजवणाऱ्या सामान्य माणसाची कथा यात दिसणार असल्याचे कळते. यात अभिषेक बच्चनही लहानशा भूमिकेत दिसणार असल्याची खबर आहे. श्रद्धा यात लीड रोलमध्ये आहे. श्रद्धा एका खास पद्धतीच्या एक्सेंटमध्ये बोलताना दिसणार आहे. शाहिद आणि श्रद्धाने याआधी 'हैदर'मध्ये एकत्र दिसले होते. यामी गौतम यात वकिलाची भूमिका साकारणार आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहिद कपूर लवकरच  नव्या घराची किंमत 55 कोटी 60 लाख आहे. त्याचे हे घर 42 आणि 43 व्या माळ्यावर आहे. शाहिदने या घरासाठी 2 कोटी 91 लाखांची स्टँप ड्यूटी दिली आहे. शाहीदचे हे घर खूपच अलिशान असल्याची चर्चा आहे. तो लवकरच या घरामध्ये शिफ्ट होणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After Deepika Padukone, Shahid Kapoor will also be seen in Madame Tussauds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.