सुशांत गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता आणि याचकारणामुळे त्याने आत्महत्या केल्याचे मानले जात आहे. त्याच्या आत्महत्येने बॉलिवूडलाही हादरा बसला. अनेकांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला.मात्र आता सुशांत सिंग मृत्युला कनेक्शन बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शनपर्यंत येऊन पोहचले आहे. या सगळ्यात मात्र सुशांत मृत्युप्रकरणात कुठेतरी दिरंगाई होत असून  इतके दिवस झाले असले तरी त्याच्या आत्महत्येसंदर्भात ठोस कारण समोर आलेले नाही. 

मुंबईतील विविध भागात #justiceforsushant चे बोर्ड. 

सोशल मीडियावर याप्रकरणाचा तपास करण्यात होत असलेल्या दिरंगाईवरून सोशल मीडियावरही संताप व्यक्त केला जात आहे.  विविध ट्रेंड देखील सोशल मीडियावर सुरू करण्यात आले आहेत. सुशांतला न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. नेटवर्क १८ लोकमतच्या रिपोर्टनुसार  #justiceforsushant, #cbiforsushant असे हॅशटॅग असलेल्या पोस्ट अनेकांनी शेअर केले आहेत. सुशांतचे चाहते, त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार या ऑनलाइन मोहिमांमध्ये सहभागी झाले होते. दरम्यान आता या मोहिमांचे पडसाद मुंबईच्या रस्त्यावर देखील उमटू लागले आहेत. मुंबईतील विविध भागात #justiceforsushant चे बोर्ड लावण्यात आले आहेत. 


कॅलिफोर्नियातही लावण्यात आले होते जस्टिस फॉर सुशांतसिंग राजपूतसाठी बोर्ड
 
सुशांतच्या आत्महत्येनंतर बहिण श्वेता सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.सुशांतला न्याय मिळावा यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी सातत्याने होत आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ समोर आला होता.जो कॅलिफोर्नियातला होता. कॅलिफॉर्नियाच्या रस्त्यांवरदेखील अशाच प्रकरचे बोर्ड लावण्यात आले होते. ज्यात सुशांतच्या फोटोसह  #जस्टिसफॉरसुशांतसिंगराजपूत. असे लिहीले होते.

सुशांतसाठी झाली ग्लोबल प्रेयर

बहीण श्वेताने एका ग्लोबल प्रेयरचे आयोजन केले होते. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने देखील लोकांना #GlobalPrayersForSSR मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. सुशांतच्या बहिणीसह त्याच्या लाखो चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली. सकाळी 10 वाजल्यापासून अनेकांनी सुशांतच्या आत्म्याच्या शांतीसाठी हात जोडून फोटो पोस्ट केले होते.यानंतर श्वेताने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला होता.ज्यात राजपूत कुटुंबीय सुशांतच्या फोटोसमोर बसून प्रार्थना करताना दिसले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After California, the #justiceforsushant board flashed on the streets of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.