बॉलिवूडमधले कोल्ड वॉर काही नवं नाही. दरदिवशी रोज नवं प्रकरणं कानावर येतं असतात. काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्रानेसलमान खानच्याभारत सिनेमात काम करण्यास ऐनवेळी नकार दिला होता. मग यात कतरिना कैफला घेण्यात आले.

प्रियंकाच्या या निर्णयामुळे खूप गदारोळ झाला होता. प्रियंकाने अचानक युटर्न घेतल्यामुळे तिच्यावर सलमान खान आणि दिग्दर्शक अली अब्बास जफरसुद्धा नाराज झाला होता.

शूटींग पाच दिवसांवर आली असताना प्रियंकाने सिनेमासाठी नकार दिला होता. साहजिकचं प्रियंकाच्या या अडेलतट्टू वागण्याने भाईजान कमालीचा संतापला होता. सलमानच्या मनात अजूनही तो राग खदखदतो आहे. या वादानंतर सलमानने प्रियंकासोबत काम करण्यास नकार दिला होता.    


हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार सलमान खान 2020मध्ये राधे सिनेमा घेऊन येतो आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रभू देवा करणार आहे. रिपोर्टनुसार दिग्दर्शक या सिनेमात मुख्य भूमिकेसाठी प्रियंका चोप्राला अप्रोच करणार होता. मात्र सलमानने प्रियंकासोबत काम करण्यास नकार दिला. शॉर्ट नोटिसवर जॅकलिन आणि कतरिनाचे नाव फायनल करण्यात आले. मात्र जॅकलिन किक2 मध्ये दिसणार आहे. त्यामुळे कॅटचे नाव फायनल करण्यात आले.    


सलमान खानचा ‘दबंग 3’ सिनेमा डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच कन्नड, तमीळ आणि तेलुगू भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटाबद्दल सलमानच्या फॅन्सना प्रचंड उत्सुकता आहे.या सिनेमात सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे. तसेच साऊथचा प्रसिद्ध अभिनेता किचा सुदीप व्हिलेनच्या भूमिकेत दिसणार आहे. तर याच सिनेमातून महेश मांजरेकरची मुलगी सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After bharat controversy salman khan refuses to work with priyanka chopra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.