बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने 2016 साली  'ये दिल है मुश्किल' सिनेमा रिलीज झाला हहोता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती. जवळपास 59 कोटीच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने 220 कोटींची कमाई केली होती. रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन आणि अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेला 'ये दिल है मुश्किल' सिनेमाला ४ वर्ष पूर्ण झाले आहेत.

सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा वेगळ्याच कारणामुळे सर्वाधिक चर्चेत राहिला. सिनेमात ऐश्वर्या आणि रणबीर या दोघांवर इंटिमेट सीन्स चित्रीत करण्यात आले होते. त्यामुळे याच गोष्टीमुळे सिनेमाने रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. |सिनेमात दोघांच्या रोमँटीक केमिस्ट्रीने धुमाकुळ घातला होता. 


मजेशीर गोष्ट म्हणजे ऐश्वर्याने स्वत: दिग्दर्शकाला हा बोल्ड सीन सिनेमात  जोडण्यास सांगितले होते. कथेचा भाग म्हणून सिनेमात हा सीन चित्रीतही करण्यात आला. मात्र त्यानंतर प्रमोशवेळी रणबीर - ऐश्वर्याचे बोल्ड फोटोशूट पाहिल्यानंतर अनेकांनी यावर टीका केली होती. चाहत्यांना या दोघांचे अशाप्रकारे बोल्ड होणे रूचले नव्हते त्यामुळे संमिश्र प्रतिक्रीया उमटल्या होत्या. सिनेमात  दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली.

सिनेमात ऐश्वर्याने तिच्यापेक्षा 9 वर्षे लहान असणाऱ्या रणबीर कपूरसोबत इंटिमेट सीन दिले होते. हा सिनेमा पाहिल्यानंतर ऐश्वर्याची सासू म्हणजेच जया बच्चन यांनी पब्लिकली ऐश्वर्याचं नाव न घेता लाज काही उरलीच नाही, असे म्हटलं होतं. एका सिनेमाशी संबंधीत कार्यक्रमात जया बच्चन यांनी सांगितले होते की, आजकाल चित्रपटांमध्ये लाज वगैरे काही उरली नाही. पहिले दिग्दर्शक आपली कला सादर करायचे. आता त्यांच्यासाठी चित्रपट बिझनेस बनला आहे. ते त्याच्या आधारावर सिनेमे बनवितात.

खरेतर करण जोहरने ऐश्वर्याला किसिंग सीन करायला देखील सांगितला होता. मात्र ऐश्वर्याने स्पष्ट नकार दिला होता. तिने अशा सीन मध्ये कम्फर्टेबल नसल्याचे सांगितले होते. चित्रपटाची डिमांड असल्यामुळे तिने इंटिमेट सीन दिले होते. या सीनमुळे बच्चन कुटुंब नाराज झाले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ae Dil Hai Mushkil Movie Turn 4 Aishwarya Rai Bachchan - Ranbir Kapoor HOT Intimate Scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.