ठळक मुद्देआदित्य मॉडेल दिवा धवनला डेट करत असून त्या दोघांचा पुढच्या महिन्यात साखरपुडा होणार आहे. ते दोघे पुढच्या वर्षी लग्न देखील करणार असल्याचे म्हटले जात आहे. 

आदित्य रॉय कपूरने व्हीजे म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याला व्हीजे म्हणून चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. त्याचदरम्यान त्याला लंडन ड्रीम्स या चित्रपटासाठी ऑडिशन देण्यासाठी सांगण्यात आले आणि त्याला हा चित्रपट मिळाला. या चित्रपटातील त्याची भूमिका छोटीशी असली तरी या भूमिकेचे कौतुक झाले होते. त्याने यानंतर अ‍ॅक्शन रिप्ले, गुजारिश यांसारख्या चित्रपटात काम केले. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता आशिकी 2 या चित्रपटामुळे मिळाली. त्याची या चित्रपटातील भूमिका चांगलीच गाजली होती. यानंतर त्याला एकही हिट चित्रपट देता आला नाही. त्याच्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या कलंक या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. सध्या तो सडक 2 या चित्रपटासाठी चित्रीकरण करत आहे.

प्रेक्षकांचा लाडका आदित्य आता त्याच्या व्यवसायिक नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आदित्य एका मॉडेलसोबत लवकरच साखरपुडा करणार असल्याच्या चर्चांना सध्या ऊत आले आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार आदित्य मॉडेल दिवा धवनला डेट करत असून त्या दोघांचा पुढच्या महिन्यात साखरपुडा होणार आहे. ते दोघे पुढच्या वर्षी लग्न देखील करणार असल्याचे म्हटले जात आहे. 

आदित्य आणि दिवा यांच्या अफेअरची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा आहे. आदित्यने कधीच त्यांच्या नात्याचा मीडियात स्वीकार केला नाही. पण कॉफी विथ करण या कार्यक्रमात आदित्यला दिवाबद्दल विचारले असता त्याने सांगितले होते की, दिवा ही खूप चांगली मुलगी असून आमच्यात खूप चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी एका फॅशन शोच्या दरम्यान आमची ओळख  झाली होती. आम्ही अनेकवेळा डिनरला देखील एकत्र गेलो आहोत. त्याचमुळे आम्ही डेट करत असल्याच्या चर्चांना ऊधाण आले होते. 

दिवा ही प्रसिद्ध मॉडेल असून तिने मनिष मल्होत्रा, जे.जे. वलाया, तरुण ताहिलियानी यांसारख्या प्रसिद्ध डिझायनरसाठी रॅम्प वॉक केला आहे. दिवा ही मुळची अमेरिकेची असून न्यूयॉर्कमधील काही चॅरिटी शोसाठी देखील तिने रॅम्प वॉक केला आहे. 


 

Web Title: Aditya Roy Kapur & Diva Dhawan set to get engaged?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.