बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर मलंगच्या शूटिंग दरम्यान जखमी झाला आहे. त्याच्या खाद्यांला दुखापत झाली आहे. त्यानंतर त्याला आराम करायला सांगितले आणि फिजिओथैरेपी सुद्धा घेतली. 'सडक2'च्या शूटिंग दरम्यान स्टंट सीन करताना त्याच्या खाद्याला पुन्हा दुखापत झाली आहे. यानंतर डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. आता तो या सिनेमातील हल्के-फुल्के सीन्स शूट करतो.  

 
आदित्य अ‍ॅक्शन रोलमध्ये दिसणार आहे. ‘मलंग’ हा एक रोमँटिक हॉरर चित्रपट आहे ज्यात आदित्य रॉय कपूरसोबत दिशा पटानी, अनिल कपूर आणि कुणाल खेमू हे कलाकार दिसतील.  

      
या चित्रपटाबद्दल बोलताना आदित्य म्हणाला,‘मलंग एक डार्क थ्रिलरपट असून हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. मी या चित्रपटाबाबत खूपच उत्साही आहे. मी प्रथमच अ‍ॅक्शन रोल करणार असून त्यासाठी मी अधिक मेहनत देखील घेत आहे.

मला या भूमिकेसाठी दहा किलो वजन वाढवावे लागले. पण, त्यामुळे माझ्या व्यक्तिमत्वात  बदल होणार आहे. तो बदल मला एक कलाकार म्हणून स्विकारायचा आहे.’ दोन सिनेमात तो वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मलंगसाठी कमी केलेले वजन आदित्यला 'सडक2' सिनेमासाठी वाढवणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aditya roy kapur accident on sadak 2 shooting after malang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.