अभिनेता आदित्य रॉय कपूर व अभिनेत्री दिशा पटानी गेल्या काही दिवसांपासून मलंग चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटातील किसिंग सीन तर दिशाच्या बिकनीतील अदा पाहून चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. त्यात आता या चित्रपटातील हमराह हे गाणे नुकतेच दाखल झाले आहे. या गाण्यात आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानी स्काय डाइविंग, सबविंग, वॉटर काइटसर्फिंग, राइडिंग क्वॉडबाइक्ससारखे अनेक एडव्हेंचर स्पोर्ट्स करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरी करत आहे. 

आपल्या या रोमांचक अनुभवांविषयी आदित्य रॉय कपूरने सांगितले की, आम्हाला या गाण्याच्या शूटिंगच्या चार दिवस आधी मॉरेशियसला जायचे होते कारण या गाण्यामध्ये आम्हाला जे वॉटर स्पोर्ट्स करायचे होते जे दिशा आणि मी आयुष्यात पहिल्यांदाच करणार होतो. हे आम्ही पूर्वी कधीच केले नव्हते. हा खूपच रोमांचक अनुभव होता कारण या दरम्यान आम्हाला खूप मजेदार गोष्टी शिकायला आणि करायला मिळाल्या. आम्ही या गाण्यादरम्यान काइट सर्फिंग देखील केले आहे जे मला नेहमीच शिकायचे होते.


दिशा पटानी म्हणाली की, आम्ही मॉरिशिसमध्ये या गाण्याचे शूटिंग केले. ही जागा खूपच सुंदर होती. हा संपूर्ण अनुभवच सुपर मजेदार होता. खास करून मी वॉटर बेबी आहे आणि मला पाण्यामधील क्रीडाप्रकार खास आवडतात. वॉटर स्पोर्ट्सची शूटिंग करण्याआधी आम्ही ५ दिवस याची ट्रेनिंग घेतली होती.

काइट सर्फिंग, क्लिफ डाइविंग, स्कूबा डाइविंगसारख्या सर्व वॉटर एक्टिविटींसाठी खूप तयारी केली होती, असे ती म्हणाली.

Web Title: Aditya Roy Kapoor and Disha Patani did Sky Diving for this movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.