सुश्मिता सेन बॉलिवूडमधील फिट सेलिब्रेटींपैकी एक आहे. आज सुश्मिता आपला वाढदिवस साजरा करते आहे. आज आम्ही तुम्हाला सुश्मिता सेनच्या आयुष्याशी संबंधीत एक किस्सा सांगणार आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार सुश्मिता सेनने एका इंटरव्हु दरम्यान सांगितले की, 2014 मध्ये एका बंगाली सिनेमा 'निरबाक'च्या शूटिंग दरम्यान ती खूप आजारी पडली होती. डॉक्टरांना कळते नव्हते की नक्की तिला काय झालंय आहे. एक दिवस ते बेशुद्ध होऊन पडली. त्यानंतर कळले की शरीरात कॉर्टिसोल हॉर्मोन बनत नाहीत. तिचं नशीब चांगले होते म्हणून ती वाचली. सुश्मिताने पूर्ण हिमतीने या आजाराचा सामना केला.   


सध्या सुश्मिता तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल यांच्यासोबत असलेल्या अफेअरला घेऊन चर्चेतआहे.रोहमनसोबत सुश्मिताची भेट कुठल्या इव्हेंट, शूटींग वा फॅशन शोमध्ये झाली नव्हती तर, सोशल मीडियावर झाली होती. रोहमन सुश्मिताचा खूप मोठा फॅन आहे. एकदा त्याने सुशला इन्स्टावर एक पर्सनल मॅसेज पाठवला. या मॅसेजचे उत्तर मिळेल, ही अपेक्षाही त्याला नव्हती.


सुश्मिता सेन बराच काळ सिनेमाच्या पडद्यापासून लांब आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘नो प्रॉब्लम’ नंतर ती सिनेमात दिसलीच नाही. मात्र, रोहमनशी असलेल्या मैत्रीमुळे ती सतत चर्चेत असते. चर्चा खरी मानाल तर, रोहमनने कधीच सुश्मिताला लग्नासाठी प्रपोज केले आहे आणि सुशनेही त्याचा लग्नाचा प्रस्ताव मान्य केला आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress sushmita sen had suffered this fatal health condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.