पॉर्न स्टार ते मोस्ट सर्च इंडियन सेलिब्रिटी असा प्रवास करणा-या   हॉट सनीचा सा-यांनीच धसका घेतलाय. 2019 मध्ये दीपिका, प्रियंका  आणि मलायका हिरोईन्सनी फॅन्सनना वेड लावलं असं विचार करत असाल तर ते चुकीचं आहे. दीपिका असो किंवा प्रियंका, कॅट असो किंवा करीना.... प्रत्येकीला वाटू लागलीय तिची भिती....सनीच्या सेक्सी अदा आणि हॉट अंदाजापुढे बॉलीवुडच्या या एक्ट्रेस 2019 मध्येही ठरल्यात फ्लॉप. नेटीझन्समध्ये सनी अशी काही पॉप्युलर ठरलीय की सा-यांना तिनं वेड लावलंय.

 

बॉलीवुडच्या या एक्ट्रेस आणि सुपरस्टार्सना मागे टाकत सनी ठरली मोस्ट सर्च्ड् सेलिब्रेटी. हा आकडा साधासुधा नसून चक्क साडेतीन कोटीहून अधिक जणांना सनीच्या हॉट आणि सेक्सी अदांनी क्लीन बोल्ड केलंय. 2019 मध्येही फेसबुक, ट्विटर किंवा युट्यूब प्रत्येक सोशल नेटवर्किंग साईट्सवर सनीचाच  जलवा पाहायला मिळाला.. नेटवर्किंग साईट्सवर हिटवर हिट मिळत असताना मोबाईल एप्सवरही या बेबी डॉलचीच जादू आहे.


मुळात भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती.


ऑन एंड ऑफ स्क्रीन बोल्ड लूकमुळे चर्चेत असणारी सनी प्रत्यक्ष जीवनातही बिनधास्त आणि रोखठोक आहे. बॉलीवुडमध्ये एडल्ट सिनेमांविषयी ती सारी जबाबदारी सरकारवर टाकतेय... तसंच सेक्सुअलिटी आणि एचआयव्हीबाबत परखडं बोलते.हॉट अदा आणि आयटम नंबर करणा-या सनीला आता काही तरी वेगळं करायचंय. सध्या ती तिच्या आयुष्यात रमली आहे. ब-याच दिवसांपासून रूपेरी पडद्यावर तिचे दर्शन घडले नसले तरीही तरी पर्सनल लाईफमध्ये सनी सध्या खूष आहे... एकूणच काय ही सध्या बॉलीवुड आणि फॅन्समध्ये फक्त सनी लिओनीची हवा आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress Sunny Leone once again most searched female celebrity of 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.