actress sherlyn chopra claims that she have seen cricketers and bollywood stars wives taking cocaine | सुपरस्टार्स क्रिकेटपटूंच्या पत्नीही ड्रग्ज घेतात...! शर्लिन चोप्राचा खळबळजनक दावा

सुपरस्टार्स क्रिकेटपटूंच्या पत्नीही ड्रग्ज घेतात...! शर्लिन चोप्राचा खळबळजनक दावा

ठळक मुद्देशर्लिनने दीपिका पादुकोणवरही निशाणा साधला. सोशल मीडियावर तिने एक व्हिडीओ शेअर केला. 

बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनबद्दल रोज नवे धक्कादायक खुलासे होत असताना आता अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने एक मोठा दावा केला आहे. मोठे क्रिकेटर्स आणि मोठ्या सुपरस्टार्सच्या बायकाही ड्रग्ज घेतात, असा दावा तिने केला आहे.
‘एबीपी न्यूज’शी संवाद साधताना तिने हा दावा केला. एकदा मी केकेआरची मॅच पाहायला कोलकात्याला गेले होते. मॅचनंतर पार्टी होती. या पार्टीत मी सुद्धा गेले होते. मी पार्टीत डान्स केला. डान्स करून थकल्यानंतर मी वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला गेले आणि तिथले दृश्य पाहून थक्क झाले. आपल्या क्रिकेट सुपरस्टार्सच्या बायका व्हाईट पावडर म्हणजेच कोकीन घेत होत्या. माझ्यासाठी हे धक्कादायक होते. काहींनी माझ्याकडे पाहून स्माईल दिले. मी सुद्धा स्माईल देऊन तडक तिथून निघाले. त्या पार्टीत मी कोणाकोणाला पाहिले, मला सगळे आठवते. वेळ आली की, मी नावेही सांगेल. कारण त्यांची नावे लपवण्याचे काहीही कारण नाही. ड्रग्जचा हा खुल्लमखुल्ला वापर थांबावा, असे मला वाटते.

बाहेरच्या लोकांसाठी हे थोडे शॉकिंग आहे, पण कोण कोण कोकेनचे अ‍ॅक्डिक्ट आहेत, कोणाचे ड्रग्जशिवाय भागत नाही, हे बॉलिवूडच्या लोकांना चांगले ठाऊक आहे, असेही शर्लिन म्हणाली.

त्यांचा खरा चेहरा समोर आला...
एनसीबी खूप चांगले काम करतेय़ बॉलिवूडचे सुपरस्टार्स आमचे आदर्श आहेत, आमचे देवी-देवता आहेत, असे लोक मानत़ पण आज त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. आता हे सुपरस्टार एनसीबीसमोर सगळे ओकणार, असेही शर्लिन चोप्रा म्हणाली.

 दीपिकावरही साधला निशाणा

शर्लिनने दीपिका पादुकोणवरही निशाणा साधला. सोशल मीडियावर तिने एक व्हिडीओ शेअर केला. यात शर्लिनने दीपिकावर जोरदार टीका केली. काही दिवसांपूर्वी दीपिकाने ‘रिपीट आफ्टर मी डिप्रेशन इज एन इलनेस,’ अशी घोषणा दिली होती. आता तिने ही घोषणा बदलून ‘रिपीट आफ्टर मी ड्रग्ज अब्यूज लीड टू डिप्रेशन’ अशी करायला हवी, अशा शब्दांत शर्लिनने दीपिकावर हल्ला चढवला.

म्हणे, ड्रग्ज ने बना दी जोडी...; ड्रग्ज प्रकरणात दीपिकाचे नाव समोर येताच रणवीर सिंग झाला ट्रोल

बॉलिवूडमध्ये खळबळ! दीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: actress sherlyn chopra claims that she have seen cricketers and bollywood stars wives taking cocaine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.