फॅशन आणि स्टाईलबाबत सेलिब्रिटी मंडळी फारच सजग असतात. त्यातच एखादी बड्या व्यक्तीची पार्टी किंवा मोठा इव्हेंट असेल तर सेलिब्रिटी आपल्या स्टाईलबाबत फारच चोखंदळ असल्याचे पाहायला मिळतेय. बॉलीवुडच्या प्रत्येक सेलिब्रिटीची स्टाईल आणि फॅशन हटके आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो अभिनेत्री सयानी गुप्ताचा.

लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सारेच  घरच्या घरी  हेअर कटिंग करताना दिसले. आत्मनिर्भर बनत सा-यांनीच घरच्या घरी हेअर कटींग करत वेळ निभावून नेली. सलून बंद असल्यामुळे घरच्या घरीच हेअर कट केल्याचा प्रयोग सयानीनेही केला. मात्र अगदीच बॉयकट केल्यामुळे तिला एक नवीन लुक मिळाला. या लूकमुळे ही आहे तरी कोण ? असा प्रश्न तिचेच चाहते तिला विचारताना दिसतायेत. होय, या सगळ्या गोष्टी जरा भन्नाटच असल्या तरी खुद्द सयानीचे चाहते तिला हा मुलगा कोण ? असे प्रश्न विचारतायेत . सोशल मीडियावर सयानीचा हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे.


सुंदर लांब केस असणा-या या अभिनेत्रीने अगदीच शॉर्ट हेअर कट केल्याने तिला ओळखणेही  जरा कठीण जात आहे. असा प्रयोग सयानीने पहिल्यांदाच केला असे नाही. यापूर्वीही तिने असे विविध प्रयोग करत सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते.  मुळात  बेधडक आणि रोखठोक भूमिका मांडण्यामुळे ती कायम चर्चेत असते. बॉलीवुडची ट्रेंडसेटर अभिनेत्री म्हणून सयानी ओळखली जाते. तिच्या हटके फॅशन सेन्सचं नेहमीच कौतुक होतं. त्यामुळे थोड्या अतंरगी वाटत असल्या तरी याच गोष्टींमुळेही सयानीवर चर्चा रंगते.

केवळ भारतातच नव्हे तर हॉलीवुडच्या मंडळींची आणि जगभरातील रसिकांची मने सयानीने जिंकली आहेत. सयानीला ऑस्ट्रेलियन गेम शो 'हॅव यू बीन पेइंग अटेंशन' शोमध्ये अतिथी होस्टच्या रूपात आमंत्रित केले गेले आहे. यापूर्वीही ब्रिटिश मालिका 'द गुड कर्मा हॉस्पिटल' आणि 'एक्सॉन'  यातील तिच्या भूमिकेच विशेष कौतुक झाले होते. आगामी काळातही सयानी 'इनसाईड इज सीझन 3' मध्ये  झळकण्यासाठी सज्ज आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress Sayani Gupta of Four More Shots prefers short hair amid lockdown. What's your view

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.