बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. यात सना खान सध्या कोरियोग्राफर मेल्विन लुइससह झालेल्या ब्रेकमुळे चर्चेत आहे. वर्षभरापासून हे दोघांचे अफेअर सुरू होते. मात्र मेल्विन सनाला चिट करत असल्याचे कळताच तिने मेल्विनसह ब्रेकअप केले. नुकत्याच एका मुलाखतीत तिने बॉयफ्रेंड मेल्विनबद्दल काही गोष्टींचा खुलासा केला. ब्रेकअपनंतर साहजिकच माझ्या मनावर मोठा परिणाम झाला आहे. मध्यंतरी डिप्रेशनचाही सामना करावा लागला. 20 दिवस झोपेच्या गोळ्या घेऊन रात्र काढल्या आहेत. दोन दिवसापासून मला आता गोळ्या न घेता शांत झोप येत असून देवाचे आभार मानते की या गोष्टी पचवण्याचे मला बळ दिले. 


सध्या मला अनेकजण सगळ्या गोष्टी विसरून आयुष्याचा पुढे विचार कर असा सल्ला देत आहेत. पण या सगळ्यांना सांगावेसे वाटते की, चिटर जे असतात ते सगळे काही विसरून पुढे जाण्याचा विचार करतात. पण, जे कमिटेड असतात त्यांच्यासाठी हे खरंच खूप कठिण असते. त्यासाठी नक्की वेळ लागतो.


आम्ही लग्न करणार होतो, यासाठी दोन्ही कुटुंबाच्या भेटीगाठी देखील झाल्या होत्या. एप्रिल 2019 पर्यंत मेल्विन माझ्या बरोबर होता. पण मे मध्ये त्याच्यात मला बदल झाल्याचे जाणवायला लागले. नेहमीच आमच्यात भांडण व्हायला लागली. जेव्हा आम्ही नात्यात होतो तेव्हा मी फक्त आणि फक्त मेल्विनलाच वेळ दिला. त्याच्यासाठी इतरांनाही वेळ दिला नाही. माझे त्याच्यावर खरे प्रेम होते आणि त्याबदल्यात मला काय मिळाले. या गोष्टी माझ्यासाठी खूप त्रासदायक असल्याचे तिने सांगितले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress Sana Khan who was in depression after the breakup, had taken sleeping pills for 20 days-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.