सुशांत सिंग राजपूतच्या निधनाचा धक्का फक्त त्याच्या कुटुंबीयांना किंवा फॅन्सला बसला नाही. तर संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला बसला आहे. सुशांत टीव्हीवर जबरदस्त यश मिळवले अनेक मित्र कमावले त्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मि देसाईने सुशांत सिंग राजपूतशी असलेल्या मैत्रीच्या संबंधाबद्दल सांगितले. न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार सुशांतबाबत बोलताना रश्मी सगळ्यांसमोर रडायला लागली. सुशांतने अनेक वर्षे छोट्या पडद्यावर काम केले होते. रश्मी देसाईचा सुशांत चांगला मित्र होता. 

रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान एका प्रश्नाचे उत्तर देताना रश्मी म्हणाली, 'याबद्दल बोलण्यात काही अर्थ आहे काय?  सुशांत एक अतिशय हुशार व्यक्ती होता, एकेकाळी आम्ही खूप जवळचे मित्र होतो. जे काही घडले ते फार वाईट आहे. ' सुशांतची आठवणीत रश्मी देसाई भावूक झाली. परंतु केवळ अशा प्रकारे लोकांना दोष देता येणार नाही. माझा दृष्टीकोन आहे आणि मला याबद्दल बोलण्याची इच्छा नाही. हा माझ्यासाठी अतिशय संवेदनशील विषय आहे.' ऐवढे म्हणून रश्मी रडू लागली. 

सुशांतच्या मृत्यूसंदर्भात एका पॅरानॉर्मल रिसर्चचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा दावा केला जातोय. सुशांतच्या मृत्यूसंदर्भात कॉस्मो पॅरानॉर्मल अ‍ॅण्ड घोस्ट हंटिंग सोसायटी ऑफ इंडिया-युके-युएसएच्या एका व्यक्तिने प्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्स्पर्ट शॉन लार्सन व ट्रासा लार्सनसोबत चर्चा केली. त्याचाच हा व्हिडीओ आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress rashmi desai cried talking about sushant singh rajput says we were close

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.