Actress pooja hegde's instagram account hacked, alert fans on twitter gda | अभिनेत्री पूजा हेगडेचे Instagram अकाऊंट हॅक, मध्यरात्री ट्विट करत फॅन्सना म्हणाली...

अभिनेत्री पूजा हेगडेचे Instagram अकाऊंट हॅक, मध्यरात्री ट्विट करत फॅन्सना म्हणाली...

अभिनेत्री पूजा हेगडचे इन्स्टाग्राम अकाऊंट बुधवारी हॅक करण्यात आले आहे.  अकाऊंट हॅक झाल्यामुळे पूजा टेन्शनमध्ये आहे. अखेर तिने डिजीटल टीमची मदत घेऊ इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळवले. मात्र यासर्व प्रकारामुळे त्रस्त झालेल्या पूजाने रात्री 1 वाजता ट्विट करुन आपल्या फॅन्सना ही माहिती दिली. 


पूजाने अर्धारात्री ट्विट केले की, मित्रांना मला माझ्या टीमने सांगितले आहे की माझे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले आहे. माझी डिजीटल टीम यात माझी मदत करते आहे.  यादरम्यान, कृपया कोणतीही आमंत्रणे स्वीकारू नका आणि कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका. धन्यवाद.'


यानंतर जवळपास 1 तासाने पूजाचे अकाऊंट र‍िकवर झाले. तिने लिहिले, गेल्या तासाभरापासून मी माझ्या इंस्टाग्रामच्या सुरक्षिततेबद्दल काळजीत होतो.माझ्या तांत्रिक टीमची मी आभारी आहे त्यांनी मला या समस्येतून बाहेर काढले. आता माझे इन्स्टाग्राम माझ्या हातात आहे. 

पूजा लवकरच सलमान खानसोबत ‘कभी ईद कभी दीवाली’मध्ये झळकणार आहे. या सिनेमात काम करण्यासाठी पूजानेही मानधन वाढवले होते. तसेच तिची लोकप्रियता पाहता निर्मात्यानेही तिला चारपटीने मानधन देत सिनेमासाठी साईन केले आहे. त्यामुळे नक्कीच आज मै उपर आसमाँ निचे अशीच काहीशी अवस्था तिची झाली आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress pooja hegde's instagram account hacked, alert fans on twitter gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.