मनोज वाजपेयीची पत्नी दिसायला आहे इतकी सुंदर, एकेकाळी बॉलिवूडची होती प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 06:00 AM2019-09-17T06:00:00+5:302019-09-17T06:00:00+5:30

बॉबी देओलची ‘करीब’मधली हिरोईन कोण होती हे तुम्हाला आठवतंय का ?

Actress neha film of kareeb know where is she? | मनोज वाजपेयीची पत्नी दिसायला आहे इतकी सुंदर, एकेकाळी बॉलिवूडची होती प्रसिद्ध अभिनेत्री

मनोज वाजपेयीची पत्नी दिसायला आहे इतकी सुंदर, एकेकाळी बॉलिवूडची होती प्रसिद्ध अभिनेत्री

googlenewsNext

बॉबी देओलची ‘करीब’मधली हिरोईन कोण होती हे तुम्हाला आठवतंय का ?, निरागस चेहऱ्याच्या या अभिनेत्री आपल्या सोज्वळ अदांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. नेहाने 'करीब' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर होगी प्यार की जीत, फिजा, राहुल, आत्मा अशा चित्रपटात ती दिसली. पण तिला जम बसवता आला नाही. एप्रिल २००६ मध्ये तिने अभिनेता मनोज वाजपेयीसोबत लग्न केले. यानंतर चित्रपटांना तिने कायमचा रामराम ठोकला आणि संसारात रमली. 


‘करीब’ची ही हिरोईन गेल्या अनेक वर्षांत इतकी बदललीय की, तिला ओळखणे कठीण व्हावे.नेहाचे खरे नाव शबाना रजा आहे. तिने तिचे नाव का बदलले, यामागेही कारण आहे. होय, नेहा चित्रपटसृष्टीत आली, तेव्हा तिला तिचे नाव बदलण्याची मुळीच इच्छा नव्हती. एका मुलाखतीत तिने याचा खुलासा केला होता.


माझ्या आईवडिलांनी मोठ्या प्रेमाने माझे शबाना नाव ठेवले होते. पण चित्रपटात आल्यानंतर नाव बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला आणि मला माझे नाव बदलावे लागले,असे तिने सांगितले होते. 


अर्थात ‘करीब’मध्ये नेहा नावाने एन्ट्री केल्यानंतर पुढे तिने आपले खरे नाव वापरणे सुरु केले होते. नाव बदलण्याची काहीही गरज नाही. पण चित्रपटांत येताच नाव का बदलावे लागते, ही गोष्ट माझ्या समजण्यापलीकडची आहे, असे तिने म्हटले होते.

लग्नापूर्वी सुमारे सात वर्षे नेहा व मनोज रिलेशनशिपमध्ये होते. नेहा आणि मनोजला एक मुलगी आहे तिचं नाव नैला आहे. बॉलिवूडला रामराम केल्यानंतर नेहा अनेकवेळा सिनेमांच्या स्पेशल स्क्रिनिंगला पती मनोजसोबत दिसते. 
 

Web Title: Actress neha film of kareeb know where is she?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.