Actress Nagma hot and sexy video viral on social media | Nagma Hot Sexy Video: नगमाचा हा व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

Nagma Hot Sexy Video: नगमाचा हा व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

ठळक मुद्देसोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत आपल्याला नगमाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

नगमा गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. पण ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. ती तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिचा युट्यूबवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या व्हिडिओला तिच्या फॅन्सची चांगलीच पसंती मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत आपल्याला नगमाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. नगमाचा जन्म हा मुंबईतील असून तिचे खरे नाव नंदिता आहे. तिने तिच्या करियरची सुरुवात बागी या चित्रपटाद्वारे केली होती. पण तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. 1990 मध्ये नगमाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असले तरी 1994 पर्यंत तिला एकही हिट चित्रपट देता आला नाही. सुहाग हा तिच्या कारकिर्दीतील पहिला हिट चित्रपट ठरला. नगमाने भोजपूरी, तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि पंजाबी या विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

नगमा आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली यांच्या प्रेमकथेची 2000 मध्ये चांगलीच चर्चा झाली होती. त्यावेळी गांगुली विवाहित होता. त्या दोघांनीही त्याकाळात त्यांच्या प्रेमकथेविषयी न बोलणेच पसंत केले होते. मात्र मागील वर्षी म्हणजेच २०१८ मध्ये नगमाने एका मुलाखतीत या गोष्टीचा स्वीकार केला होता. ती म्हणाली होती की, आम्ही एकमेकांना खूप पसंत करत होतो. आम्ही कधी प्रसारमाध्यमांसमोर ही गोष्ट कबूल केली नव्हती. मात्र ते खरे होते. त्यावेळी त्यांच्या करियरसाठी चांगला काळ होता आणि ते भारतीय संघाचे कर्णधार होते. मात्र २००० साली गांगुली यांचे करियर टॉपवर होते त्यावेळी चाहते भारतीय संघाचा पराजय आणि कर्णधाराचा वाईट परफॉर्मन्स सहन करू शकत नव्हते. तिने पुढे सांगितलं की, याचा आमच्या नात्यावर परिणाम पडत होता. त्यावेळी गांगुलींना करियरवर फोकस करायचे होते. त्यामुळे आम्ही वेगळे व्हायचा निर्णय घेतला. हा निर्णय अगदी योग्य होता. त्यावेळी मी चाहत्यांची प्रतिक्रिया पाहून खूप हैराण झाले होते. आम्ही दोघे एकमेकांच्या सहमतीनं वेगळे झालो होतो. आजही आम्ही एकमेकांचा आदर करतो.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress Nagma hot and sexy video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.