गेल्या काही दिवसांत कोरोनाने सेलिब्रेटींना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. रोज कोणत्या ना कोणत्या कलाकाराला कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या येत आहेत. यात अशाही काही बातम्या असतात ज्यांना वाचून चाहतेही अस्वस्थ होतात.

 

 

अशात मिनाक्षी शेषाद्रीच्याही निधनाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. अखेर फिल्मी फिवरने मिनाक्षी शेषाद्रीच्या निधनाची बातमी अफवा असल्याचा खुलासा केला आहे. मिनाक्षी शेषाद्री सुखरुप त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


खुद्द मिनाक्षी शेषाद्रीने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फोटो शेअर केला आहे. नुकताच शेअर झालेल्या या फोटोमुळे त्या सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.  अमेरिकेच्या डॅलास शहरात पती आणि दोन मुलांसोबत राहणाऱ्या मीनाक्षी शेषाद्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन हा फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोला त्यांनी एक कॅप्शनही दिली आहे. डान्स पोज! म्हणत त्यांनी हा फोटो चाहत्यांसह शेअर करत  मृत्यूशी संबंधित सर्व अफवांना अखेर पूर्णविराम लावला आहे. 

'इंडिया टीव्ही न्यूज चॅनल' वर १ मेला तलाश हा शो प्रसारित झाला होता. या शोमध्ये बॉलिवूड पासून लांब गेलेल्या अभिनेत्रींचा आढाव घेतला जातो.

 

१ मेला प्रसारित झालेला शो मिनाक्षी शेषाद्रीच्या आयुष्यावर आधारित होता. या शोची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली. चाहत्यांनी मात्र वेगळाच तर्क लावला आणि थेट मिनाक्षी शेषाद्रीचे निधन झाल्याचा सांगितले गेले.  जो तो सोशल मीडियावर मिनाक्षीवरच चर्चा करु लागला. 

प्रसिद्धीच्या झोतात असताना या कारणामुळे मिनाक्षी शेषाद्रीने अचानक सोडले होते बॉलिवूड

मिनाक्षीचे लग्न हरिश मैसूर यांच्यासोबत झाले असून ते इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत. ते परदेशात स्थायिक आहेत. त्याचमुळे मिनाक्षी गेल्या अनेक वर्षांपासून परदेशातच राहाते. बॉलिवूडपासून दूर राहून ती आपल्या पतीला आणि कुटुंबियांना वेळ देत आहे. ती अभिनय क्षेत्रात नसली तरी आपली नृत्याची आवड जोपासत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress Meenakshi Seshadri Quashes Death Rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.