बॉलिवूडची 'जुम्मा चुम्मा गर्ल' म्हणजेच अभिनेत्री किमी काटकर हिने १९९१ साली प्रदर्शित झालेल्या 'हम' चित्रपटातून किमी काटकरनेअमिताभ बच्चन यांच्यासोबत रोमांस केला होता. आज 'जुम्मा चुम्मा गर्ल' म्हणजेच किमी काटकर हिचा वाढदिवस आहे. किमी काटकर ८० व ९०च्या दशकातील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक होती.


१९८५ साली 'पत्थर दिल' चित्रपटातून किमी काटकरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने सपोर्टिंग भूमिका केली होती.

या चित्रपटानंतर किमीला अॅडव्हेंचर ऑफ टारझन चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली होती. हा चित्रपट फ्लॉप ठरला होता मात्र किमीला इथूनच ओळख मिळाली होती.


या चित्रपटात किमीने इतके बोल्ड सीन दिले की तिची इमेज सेक्सी हिरोईनची बनली. त्यानंतर तिच्याकडे चित्रपटांच्या रांगा लागल्या होत्या. यात 'खून का कर्ज', 'जैसी करनी वैसी भरनी', 'गैर कानूनी' व 'मेरा लहू' यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

१९९१ साली प्रदर्शित झालेला 'हम' किमीचा सुपरहिट चित्रपट होता. किमीचा शेवटचा सिनेमा 'हमला' होता जो १९९२ साली प्रदर्शित झाला होता. 


किमने लग्न केल्यानंतर ती बॉलिवूडपासून दुरावली. तिने १९९२ साली फोटोग्राफर व अॅड फिल्ममेकर शंतनु शौरीसोबत लग्न केले. लग्नानंतर ती मेलबर्नमध्ये सेटल झाली. किमीला एक मुलगा देखील आहे ज्याचे नाव सिद्धार्थ आहे. काही काळानंतर किमी
पुण्यात राहू लागली. 

किमी कधीकधी बॉलिवूडच्या इव्हेंटमध्ये पहायला मिळते. ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती फोटो शेअर करत असते.

Web Title: Actress Kimi Katkar Birthday Special Know Why She Leave Film Industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.