ठळक मुद्देकल्की  दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर 2011 मध्ये दोघांनीही लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही.

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपची एक्स-वाईफ कल्की कोच्लिन हिच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. होय, कल्की आई होणार आहे. ते सुद्धा लग्नाआधी.  घटस्फोटित कल्की सध्या एका इस्रायली पियानो वादकाला डेट करतेय. कल्की याच पियानो वादकाच्या बाळाची आई होणार आहे. नुकतीच कल्कीने आई बनणार असल्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. पण तेव्हापासून सतत कल्कीला ट्रोल केले जातेय. ‘पिंकविला’ला दिलेल्या एका ताज्या मुलाखतीत कल्कीने याबाबत खंत व्यक्त केली.


  ‘या देशात अविवाहित राहून आई झालेल्या स्त्रीबद्दल लोक सर्रास जजमेंटल होतात. टोकाच्या प्रतिक्रिया देतात. मी लग्नाआधी आई बनणार म्हटल्यावर सतत मला ट्रोल केले जातेय. तुझा नवरा कुठाय? असले विचित्र प्रश्न मला विचारले जातात. प्रेग्नंसीच्या काळात घट्ट कपडे घालू नकोस, इथपर्यंत फुकटचे सल्ले मला दिले जात आहेत. अर्थात मी ही टीका मनावर घेत नाही. अभिनेत्री असल्याने या टीकेला कसे सामोरे जायचे, हे मी नक्कीच शिकले आहे. टीका करणाºयांपेक्षा माझ्या काही जवळच्या माणसांचे प्रेम मला महत्त्वाचे वाटते.  माझे शेजारी, आप्त आवर्जून माझी चौकशी करतात. मला हवं-नको ते बघतात. त्यांच्यासाठी माझे लग्न झालेय की नाही, हे महत्त्वाचे नाही, असे कल्की या मुलाखतीत म्हणाली.  


 येत्या डिसेंबरमध्ये कल्की बाळाला जन्म देण्याची शक्यता आहे. त्यासाठीचे तिचे प्लॅन्स तयार आहेत. बाळाच्या जन्मासाठी ती गोव्याला जाणार आहे. 
कल्की इस्रायली पियानो वादक Guy Hershberg याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

कल्कीने काही दिवसांपूर्वी त्याच्यासोबतचा फोटो शेअर करत, हे नाते जगजाहिर केले होते. या फोटोत कल्की बॉयफ्रेन्डला किस करताना दिसली होती.   2009 मध्ये  देव डी  या चित्रपटाच्या सेटवर कल्की  दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर 2011 मध्ये दोघांनीही लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही.

2015 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला. पण घटस्फोटानंतरही आजही कल्की व अनुराग कश्यप एकमेकांचे चांगले मित्र आहेत.  कल्कीला घटस्फोट दिल्यानंतर अनुराग शुभ्रा शेट्टी या त्याच्यापेक्षा 21 वर्षांनी लहान तरूणीच्या प्रेमात पडला. पण कल्की आत्तापर्यंत सिंगल होती.पण आता कल्की प्रेमात पडलीय. नुसतीच प्रेमात नाही तर आता ती आई देखील होणार आहे.

Web Title: actress kalki koechlin says she was been trolled for being pregnant without marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.