ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या जान्हवी ‘दोस्ताना 2’मध्ये बिझी आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या कुठे आहे तर वाराणसीत. होय, ‘दोस्ताना 2’ या आगामी सिनेमाचे पहिले शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर जान्हवी सध्या वाराणसीत सुट्टी एन्जॉय करतेय. आपल्या दोन मित्रांसोबत वाराणसीच्या गल्लीबोळात ती मुक्तपणे फिरतेय. यादरम्यानचे तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


पारंपरिक पोशाखातील जान्हवी अनेक ठिकाणी चेहरा लपवून फिरताना दिसली. यादरम्यान मित्रांसोबत गंगा आरतीतही ती सहभागी झाली. मोठ्या भक्तीभावाने तिने गंगाआरती केली.


गंगाआरतीनंतर जान्हवी वाराणसीत फिरताना दिसली. स्टारडम विसरून अगदी रिक्षातून ती फिरली.


बाजारात फिरताना मात्र तिने आपला चेहरा लपवला. वाराणसीच्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून फिरताना तिने येथील अनेक खाद्य पक्वानांचा स्वाद घेतला.


जान्हवीचे वाराणसीचे फोटो चाहत्यांना प्रचंड भावले आहेत. यावर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या जान्हवी ‘दोस्ताना 2’मध्ये बिझी आहे. यानंतर ‘रूही आफ्जा’ या रोमॅन्टिक हॉरर सिनेमात ती दिसणार आहे. यात राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये तसेच ‘घोस्ट स्टोरिज’ या वेबसीरिजमध्येही जान्हवी दिसणार आहे.

Web Title: actress janhvi kapoor attend ganga aarti in varanasi with friends photos goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.