बॉलिवूडची बिल्लो राणी म्हणजेच अभिनेत्री बिपाशा बासू आणि तिचा नवरा करण सिंग ग्रोव्हर यांची मुख्य भूमिका असलेली 'डेंजरस' ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजच्या प्रमोशनवेळी इंटरव्ह्यूमध्ये बिपाशाने आपल्याला किसिंग सीन्सची भीती वाटायची असे सांगितले. बिपाशाने सांगितले की जर सहकलाकार हा तुमचा नवरा असेल तर गोष्टी बऱ्याच सोप्या होतात. कारण अशावेळी दृश्ये चित्रीत करत असताना तुम्ही पहिले कलाकार असता आणि सोबतच तुम्ही नवरा बायकोही असता.

स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत बिपाशा बासू म्हणाली की, नवरा सहकलाकार असेल तर शारिरीक जवळीकीची दृश्ये करत असताना तणाव येत नाही आणि आजारीही पडायला होत नाही. यापूर्वी चुंबन दृश्ये देत असताना ती चित्रीत होऊ नयेत यासाठी मी प्रयत्न करायचे. मला भीती वाटते, मला चक्कर येतेय. मला बरं वाटत नाहीये असं सांगून मी ही दृश्ये चित्रीत होऊ नयेत यासाठी प्रयत्न करायचे.


बिपाशाने जोडी ब्रेकर या चित्रपटावेळचा अभुनव यावेळी सांगितला. ती म्हणाली की या चित्रपटात आर. माधवन हा तिचा सहकलाकार होता. माधवन हा माझा चांगला मित्र आहे, मात्र चित्रीकरणापूर्वी माझा प्रचंड थरकाप उडाला होता. चित्रीकरणाच्या आदल्या दिवशी आपल्याला हृदयविकाराचा झटका येणे बाकी होते, बिथरले होते आणि मनात अस्वस्थता होती.

माझ्या मित्रांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला की माधवन सोबत हे दृश्य आहे आणि तो तुझा चांगला मित्र आहे. तो चांगला मित्र आहे हीच मोठी अडचण असल्याचे मी त्यांना म्हटले होते. त्याच्यासोबत असले दृश्य चित्रीत करणे मला योग्य वाटत नव्हते असे तिने सांगितले.

ती पुढे म्हणाली की, मी कसेबसे किसिंग सीन्स पार पाडले आणि त्यानंतर सेटवरील सगळे जण मला हसायला लागले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The actress herself fell ill due to kissing scenes, she revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.