बॉलिवूडच्या कलाकारांचेदेखील अंडरवर्ल्डसोबत नातेसंबंध राहिलेले आहेत. इतकंच नाही तर काही अभिनेत्रींना आपले करियर पणाला लावत अंडरवर्ल्डच्या डॉनच्या प्रेमातदेखील पडल्या होत्या. या आहेत त्या अभिनेत्री...

ममता कुलकर्णी व छोटा राजन


आपल्या करियरच्या छोट्या कारकीर्दीत ममता कुलकर्णी आपल्या अभिनयामुळे नाही तर चित्रपटातील बोल्ड भूमिकांमुळे चर्चेत राहिली होती. नव्वदच्या दशकातील ती सुपरहिट अभिनेत्रींपैकी एक होती. ममता कुलकर्णीला चित्रपटात काम छोटा राजनच्या सांगण्यावरून मिळत होते. असं सांगितलं जातं की ममता व छोटा राजनचे अफेयर होते आणि दोघांना लग्नदेखील करायचे होते.

अनीता अयूब व दाऊद इब्राहिम


दाऊदची नव्वदच्या दशकातील पाकिस्तानी अभिनेत्री अनीता अयूबसोबत जवळचे नातेसंबंध होते. दोघांचे नात्यांची अफवा वाऱ्यासारखी सिनेइंडस्ट्रीत पसरली होती. अशी चर्चा होती की जेव्हा निर्माते जावेद सिद्दीकीने १९९५ साली अनीताला आपल्या चित्रपटात घेण्यास नकार दिला होता त्यावेळी दाऊदच्या गँगने त्याला मारले होते. त्यावेळी दाऊदला सिनेइंडस्ट्रीत खूप इंटरेस्ट होता. असंही सांगितलं जातं की त्याने कित्येक सिनेमे बनवण्यासाठी पैसे दिले होते.

मंदाकिनी व दाऊद इब्राहिम


'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातील अभिनेत्री मंदाकिनीला १९९४-९५ साली दुबईतील शारजाहमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत पाहिले होते. दोघांचे फोटो व कित्येक कथा चर्चेत आल्या होत्या. मात्र मंदाकिनी हिने नेहमीच या वृत्ताना दुजोरा दिला नाही. मात्र १९९६ साली प्रदर्शित झालेला चित्रपट जोरदारसोबत तिचे करियर संपुष्ठात आले. असेही बोलले जाते की दाऊदमुळेच मंदाकिनीला सिनेमात काम मिळत होते. बदनामीमुळे तिला काम मिळणं कमी झाले होते.

सोना व हाजी मस्तान


दाऊद इब्राहिमच्या आधी अंडरवर्ल्ड जगतात हाजी मस्तान हे नाव खूप मोठे होते. हाजी मस्तान व बॉलिवूड अभिनेत्री सोना यांच्या अफेयरच्या चर्चा रंगल्या होत्या. सोनासोबत लग्न करून तिच्यासोबत संसार थाटण्यासाठी हाजी मस्तान अंडरवर्ल्डचा डॉन बनला. त्यांची लव्हस्टोरी 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई' चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. असं सांगितलं जातं की बंबईचा प्रसिद्ध डॉन असूनही हाजी मस्तानने कधी बंदुकही हातात घेतली नव्हती व गोळीदेखील चालवली नव्हती. जेव्हा कधी त्याला अशा कामांची गरज पडली तेव्हा त्याने दुसरा गँगस्टर वर्दराजन मुदालियार व करीम लालाची मदत घेतली होती.

मोनिका बेदी व अबू सालेम


मोनिका बेदी तिच्या करियरमध्ये जास्त कॉन्ट्रॉव्हर्शियल लाईफसाठी ओळखली जाते. मोनिका व अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम यांच्या अफेयरच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. असं सांगितलं जातं की चित्रपटात काम मिळवण्यासाठी मोनिका अबू सालेमला दिग्दर्शकांना धमकी द्यायला सांगायची. पोलिसांच्या भीतीने दोघेही देश सोडून पळून गेले होते. पोलिसांनी पकडल्यानंतर मोनिका व अबू सालेमच्या नात्याला पूर्णविराम लागला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The actress had fallen in love with Underworld Dawn and is missing from Bollywood.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.