actress dipannita sharma snaps sanjay dutt and kapil sharma for making fun of 308 girlfriends | संजूबाबाचा ‘308 गर्लफ्रेन्ड’चा जोक ऐकून अभिनेत्रीची सटकली, केले ट्वीट
संजूबाबाचा ‘308 गर्लफ्रेन्ड’चा जोक ऐकून अभिनेत्रीची सटकली, केले ट्वीट

ठळक मुद्देसध्या तिचे हे  ट्वीट वेगाने व्हायरल होतेय.

‘पानिपत’च्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावणा-या संजय दत्तच्या एका जोकवर सगळेच हसले होते. पण बॉलिवूडची एक अभिनेत्री मात्र संजूबाबाच्या या जोकने जाम भडकली आहे. होय, या अभिनेत्रीचे नाव आहे, दीपानिता शर्मा.
 ‘पानिपत’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संजय दत्त नुकताच ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर गेला होता.  यावेळी कपिलने संजयला त्याच्या 308 गर्लफ्रेन्डबद्दल विचारले. यावर संजयने एक जोक केला होता. 

‘माझ्या गर्लफ्रेन्डचा आकडा मी मोजत असतो. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण माझे आयुष्य अजून संपलेले नाही. पानिपत या चित्रपटातील क्रितीच्या कामाने मी प्रचंड प्रभावित झालो आहे. ती नक्कीच माझी 309 वी गर्लफ्रेन्ड बनू शकते,’ असे संजूबाबा म्हणाला होते. त्याचे हे उत्तर ऐकून सगळ्यांनाच हसू आले होते. पण नेमक्या याच उत्तरावरून दीपानिताने संजूबाबाला धारेवर धरले आहे. 

संजयच्या जोकवर सगळे हसले. एखाद्या महिलेने या शोमध्ये अशाप्रकारचे विधान केले तर लोक त्यावरही हसणार का?  असा प्रश्न तिने उपस्थित केला.  
‘एक अभिनेता आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका शोमध्ये जातो आणि आपल्या 300 पेक्षा अधिक गर्लफ्रेन्डच्या आकड्यावर बोलतो. होस्ट आणि प्रेक्षक यावर हसतात. हीच गोष्ट एका महिलेने केली तर काय होईल? काय तेव्हाही लोक याला विनोदी अंगाने घेतील? लैंगिक आधारावरचा हा भेदभाव चुकीचा आहे. हेच सर्व वाईट गोष्टींचे मूळ आहे,’असे  ट्वीट दीपनिताने केले आहे. सध्या तिचे हे  ट्वीट वेगाने व्हायरल होतेय.

Web Title: actress dipannita sharma snaps sanjay dutt and kapil sharma for making fun of 308 girlfriends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.