'पती पत्नी और वो’ सिनेमाने  पहिल्या तीन दिवसांमध्ये एकंदरीत ३५.९४ कोटींचा गल्ला जमावला आहे.  सिनेमात कार्तिक आर्यन, अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा प्रदर्शित झाला असला तरीही कलाकार प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. अशा एका प्रमोशनमध्ये भूमी पेडणेकरला एक वेगळाच  प्रश्न विचारण्यात आला. सिनेमात अनेक बोल्ड डॉयलॉग्स आहेत.  भूमीच्या वाट्यालाही असे अनेक बोल्ड डायलॉग आले आहेत. सिनेमात भूमिवर एक सीन चित्रित करण्यात आला आहे. कार्तिक लग्नासाठी मुलगी बघायला जातो तेव्हा तो “आपको क्या करना पसंत है?,” असा प्रश्न भूमीला विचारतो.

त्यावर भूमी “मुझे सेक्स बहुत पसंद है,” असं उत्तर देते. हा डॉयलॉग म्हणताना नेमका डोक्यात काय विचार होता? थोडे अवघडल्यासारखे वाटले नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर  भूमीने सांगितले की, हा डायलॉग बोल्ड असला तरीही आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मुलीच्या तोंडी दाखवण्यात आल्याने त्यामध्ये विचित्र वाटण्यासारखं काही नव्हतं,”  बिनधास्तपणे दिलेल्या या उत्तरावर अनेकांनी भूवया उंचावल्या असल्या तरी  दुसरीकडेतिने साकारलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक होत आहे. 

भूमी पेडणेकर सध्या तिच्या अफेयरमुळे चर्चेत आली आहे. भूमी बॉलिवूडच्या एका हिरोच्या प्रेमात पडल्याचे सध्या कानावर येतेय. हा हिरो कोण तर जॅकी भगनानी. फिल्मफेअरने दिलेल्या वृत्तानुसार, भूमी व जॅकी यांच्यात सध्या एक वेगळेच बॉन्डिंग पाहायला मिळेतय. आत्तापर्यंत या दोघांत केवळ मैत्री होती. पण आता ही मैत्री यापलीकडे गेल्याचे कळतंय. इंटेक्स्ट लाइव्हनं दिलेल्या वृत्तानुसार, आता जॅकी तिला प्रोफेशनल सल्लेदेखील देऊ लागलाय.


अद्याप भूमी आणि जॅकीने आपले नाते जगजाहिर केलेले नाही. पण दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे लपून राहिलेले नाही. तूर्तास दोघांनीही आपल्या लिंकअपच्या चर्चांवर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण येत्या दिवसांत दोघेही यावर काय प्रतिक्रिया देतात, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

Web Title: Actress Bhumi Pednekar is so Straight Forward that Publicly She Says She likes Sex Openly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.