गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री भुमी पेडणेकर वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असते.  'पति-पत्नी और वो' सिनेमाला मिळालेल्या भरघोस यशानंतर आयुषमान आणि भुमी ही जोडी जास्तच लाईमलाइटमध्ये आले आहेत. भुमी पेडणेकर आणि आयुषमान खुराणा या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली.  'दम लगा के हईशा', 'शुभ मंगल सावधान' या दोघांच्या जोडीने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले. 


तसेच दोघांमध्ये खूप चांगली मैत्री देखील आहे. त्यामुळे आयुषमान भुमीबद्दल जरा जास्तच माहिती ठेवतो. दिलेल्या एका मुलाखतीत तर आयुषमानने भुमी विषयी एक मजेशीर गोष्ट सांगितली आहे. या दोघांनी टीवी शो 'BFF वोग' मध्ये हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी एकमेकांविषयी अनेक खुलासे केले.  

नेहा धूपियाने विचारलेल्या एका भन्नाट प्रश्नावर भुमी पेडणेकरवर तुफान चर्चा झाली. नेहाने आयुषमानला विचारले की, सेक्स न करता तो किती दिवस राहू शकतो? त्यावेळी त्याने सांगितले की, जितके दिवस मी बाहेर शूटिंगसाठी असतो. तितके दिवस सेक्स न करता राहू शकतो. 


आयुषमान नंतर हाच प्रश्न नेहाने भूमीला विचारला तेव्हा भुमी ऐवजी आयुषमानेच याचे उत्तर दिले. भुमी फक्त एक तास सेक्स न करता राहू शकते, तसेच भुमीला ज्याला कोणाला डेट करायचे असेल त्यासाठी खास टीप्स देत त्याने भुमीची टर खेचली. भुमीनेही न थांबता  'हां मुझे स्लो रोमांस पसंद है म्हणत आयुषमानची मजा घेतली.   

 

Web Title: Actress Bhumi Pednekar Can't Stay without Sex More Than An Hour Ayushman khurana Had Revealed this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.