अमृता राव गेल्या काही काळापासून चित्रपटांपासून दूर होती. मुलाच्या जन्मानंतर अचानक अमृता चर्चेत आली. अमृताने मुलाचे नाव वीर ठेवले असून  1 नोव्हेंबर 2020 रोजी तिने वीरला जन्म दिला होता.  मुलाच्या जन्मानंतर  एका मुलाखतीत अमृताने आपला  अनुभव शेअर केला आहे. लग्नाच्या 5 वर्षानंतर अमृता आई बनली. आरजे अनमोलसह ती ७ वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर 2016 मध्ये लग्न कुटुंबाच्या सहमतीने लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली. आई बनल्यानंतर अमृताची जबाबदारी आणखी वाढली आहे. 

आईचा हा फुल टाईम जॉब असून संपूर्ण रात्र मला जागून काढाव्या लागत आहे. मध्येच बाळाला फिडींग करावे लागत आहे. तो झोपत नाही तोपर्यंत मला जागेच राहावे लागते. वीरच्या टाईमटेबलप्रमाणे माझे काम करावे लागते.

त्यामुळे कधी कधी प्रचंड वैतागही येतो. पण आई बनल्यानंतर आपले मुलंच आपली पहिली जबाबदारी असते. त्याचप्रमाणे वीर माझी पहिली प्रायोरिटी बनला आहे. माझं संपूर्ण आयुष्यच त्याच्याभोवती फिरत असतं. त्यामुळे तो काय करतोय, माझी प्रत्येक वेळ त्याची बनली आहे. 

वीरला सांभाळण्यात पती अनमोलची खूप मदत होते. तो खरोखरच बेस्ट डॅड आहे. वीरची लंगोट बदलण्यापासून ते त्याला आंघोळ घालण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तो देखील माझ्याप्रमाणेच वीरची काळजी घेतो.  त्यामुळे वीर ही केवळ माझी जबाबादारी नसून अनमोलची पण आहे. दोघेही मिळून सध्या आम्ही वीर सोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहोत.

शाहिद कपूरसोबतच्या अफेयरच्या चर्चेवर अमृता रावने तोडली चुप्पी, म्हणाली- आम्ही मित्रदेखील नाही

ज्यावेळी शाहिद कपूर आणि अमृता राव यांनी यशस्वी चित्रपट देत होते त्याचवेळी शाहिद आणि करीना एकमेकांना डेट करत होते. तरीदेखील त्यावेळी मीडियामधील काही वृत्तांमध्ये दावा करण्यात आला की शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्यामध्ये प्रेम फुलत होते. शाहिद कपूर आणि अमृता रावने अशा वृत्तांना कधीच दुजोरा दिला नव्हता आणि एकत्र चित्रपट काम करत राहिले.अमृता रावने दावा केला आहे की भलेही तिचे आणि शाहिदच्या प्रेमात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण ते दोघे खूप चांगले मित्र देखील नव्हते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress Amrita Rao Talk About Motherhood Experience After 4 Month Giving Birth To Son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.