बॉलिवूडच्या या अभिनेत्याला चक्क 150 ऑडिशन्समधून केले होते रिजेक्ट, एका रात्रीत बदलले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 06:30 AM2019-09-23T06:30:00+5:302019-09-23T06:30:00+5:30

बॉलिवूडमध्ये त्यांने आपल्या करिअरची सुरुवात 'किस्मत लव पैसा दिल्ली'सिनेमातून केली मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती राणी मुखर्जीच्या मर्दानी सिनेमातून.

Actor tahir bhasin got rejected from 150 audiences | बॉलिवूडच्या या अभिनेत्याला चक्क 150 ऑडिशन्समधून केले होते रिजेक्ट, एका रात्रीत बदलले आयुष्य

बॉलिवूडच्या या अभिनेत्याला चक्क 150 ऑडिशन्समधून केले होते रिजेक्ट, एका रात्रीत बदलले आयुष्य

googlenewsNext

गितांजली आंब्रे 

ताहिर राज भसीनने आपल्या करिअरची सुरुवात 'किस्मत लव पैसा दिल्ली' या सिनेमातून केली मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती राणी मुखर्जीच्या मर्दानी सिनेमातून. या सिनेमात त्याने साकारलेल्या खलनायकाची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस पडली. यानंतर ताहिर मंटो आणि फोर्स-2 मध्ये दिसला. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या सुशांत सिंग राजपूतच्या छिछोरे सिनेमात ताहिरने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ताहिरने साकारलेली डेरेकची भूमिका देखील प्रेक्षकांना आवडली आहे. यानंतर तो कबीर खानच्या 83 सिनेमात सुनील गावस्कर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ताहिरच्या आतापर्यंत प्रवासाबाबत त्याच्याशी साधलेल्या हा खास संवाद 


तुझ्या छिछोरे सिनेमाला मिळालेल्या यशाकडे तू कसा बघतोस ?
छिछोरेला जे प्रेक्षकांचे प्रेम मिळाले ते पाहून खूप आनंद झाला. हा सिनेमा मनोरंजन करता-करता तुम्हाला एक संदेशसुद्धा देऊन जातो. सिनेमाच्या शूटिंग दरम्यान ही आम्ही तेवढीच धमाल आली होती. सिनेमा रिलीज होण्याच्या आधी जेव्हा आम्ही तो पाहिला त्यावेळी एक अभिनेता म्हणून मला खूप आत्मविश्वास आला की हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करणार. सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या पसंतीस तो उतरलाच. तसेच ज्यावेळी तुमच्या कामाचं कौतूक प्रेक्षक करतात त्या गोष्टीचा आनंद खूप वेगळा असतो. 

या सिनेमात तुम्ही सगळे एकाच वयोगटातील होतात, तर तुम्ही सेटवर किती धमाल-मस्ती करायचात ?
सेटवर तर दिग्दर्शकाने आम्हाला पूर्ण सूट दिली होती. त्याचे म्हणणे होते की, जोपर्यंत ती भूमिका तुम्ही फील करणार नाही तोपर्यंत ती नीट होणार नाही. तसेच ज्यादिवशी शूटिंगला सुट्टी असायची त्याच्या आदल्यादिवशी आम्ही सुशांत सिंगच्या घरी जायचो. तिथे आम्ही आमच्या कॉलजच्या दिवसातील आठवणींना उजाळा द्यायचो. आतापर्यंतच्या प्रवासाबाबत सांगायचो. त्यामुळे आमचं एकमेकांशी स्ट्राँग बॉन्डिंग झाले होते. 

बॉलिवूडमध्ये तू कोणाला आपला आदर्श मानतोस, कुणाचा सिनेमा बघून तू बॉलिवूडमध्ये येण्याचे ठरवलेस ?
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. त्यांचे अग्नीपथ, हम, दिवार, शोले हे माझं आवडते सिनेमा.    
लहानपणी मी शाहरुख खानचे सिनेमा बघायचो. मला वाटतं दिल्लीचा प्रत्येक मुलगा शाहरुख खान बनण्यासाठीच मुंबईत येतो. शाहरुखचा कभी हा कभी ना या सिनेमा मला खूप आवडला होता. बाजीगर, डर हे सिनेमा पाहून मी मुंबईत आल्यावर यशराजच्या एकातरी सिनेमात काम करायचे असे ठरवलेच होते. तो योग जळून देखील आला राणी मुखर्जीच्या मर्दानीच्या निमित्ताने. मर्दानीनतंर एका रात्रीत माझं आयुष्य बदलले. त्याआधी मी जवळपास 150 ऑडिशनमधून रिजेक्ट झालो होतो त्यामुळे मला असं वाटते की हरल्याशिवाय तुम्हाला यशाची किंमत कळतं नाही. 


 
तुला कोणत्या जॉनरचे सिनेमा करायला भविष्यात आवडतील ?

कॉमेडी किंवा रोमांटिक, याचे कारण असं की मला कंटाळा खूप लवकर येतो आणि म्हणूनच मी बॉलिवूडमध्ये आलो. कारण इथं नेहमीच काही तरी वेगळं करायला मिळतं. तु्म्ही माझं आतापर्यंतचे सिनेमा बघाल तर त्यात साकारलेली मी प्रत्येक भूमिका वेगळी आहे. मर्दानी हा क्राईम ड्रामा होता, फोर्स 2 एक अॅक्शनपट होता, मंटोबाबत बोलायचे झाले तर तो एका लेखकाचा बायोपिक होता,   आताच आलेला छिछोरे एक कॉलेज ड्रामा सिनेमा होता आणि येणार '83' एक स्पोटर्स ड्रामा आहे. माझ्या आतापर्यंतच्या भूमिकांमध्ये वैविध्य राहिले आहे. 


83 सिनेमाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण झाले आहे याबाबत काय सांगशील ?
शूटिंगच्या आधी आमचं क्रिकेटचं प्रशिक्षण शिबीर झालं होते. मला क्रिकेट खेळायला येत नसल्याने मला बॅट हातात कशी पकडतात यापासून गोष्टी शिकवण्यात आल्या. क्रिकेट खेळणं एक गोष्ट आहे पण सुनील गावस्कर यांच्यासारखे क्रिकेट खेळणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. माझ्या नशिबाने मी गावस्करांचे शॉट्स बॉडी डबलची मदत न घेतल्याशिवाय खेळतो आहे. दिग्दर्शक कबीर खान सिनेमाला घेऊन खूप क्लीअर आहे. जर ऑनपेपर एखादा सीन लॉडर्समध्ये झाला आहे तर कबीर खान तो लॉर्डसवर जाऊनच शूट करणार. त्यामुळे सिनेमा पाहताना तुम्ही रिअॅलिटीच्या खूप जवळ जाता.     
 

Web Title: Actor tahir bhasin got rejected from 150 audiences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.