मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील कलाकार राहतोय हिमालयातील गुफेत, एका सीनमुळे झालेला प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 12:10 PM2019-11-13T12:10:11+5:302019-11-13T12:18:48+5:30

एक म्हणजे मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात जादू की झप्पी सीनमुळे प्रसिद्ध झालेले सफाई कर्मचारी, ज्यांना संजय दत्त जादूची झप्पी देतो. 

Actor Surendra Rajan from Munnabhai MBBS liviing in Himalaya | मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील कलाकार राहतोय हिमालयातील गुफेत, एका सीनमुळे झालेला प्रसिद्ध

मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील कलाकार राहतोय हिमालयातील गुफेत, एका सीनमुळे झालेला प्रसिद्ध

googlenewsNext

हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांचं जगणं, जीवनशैली आलिशान असते हे साऱ्यांना माहिती आहे. मात्र या गोष्टीला काही कलाकार अपवाद असतात. त्याची जीवनशैली अत्यंत सामान्य असते. मनमौजी, आपल्याच धुंदीत आणि आपल्या अटी शर्तींवर जीवन जगणारे कलाकारही या चित्रपटसृष्टीत आहेत. त्यापैकी एक म्हणजे मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात जादू की झप्पी सीनमुळे प्रसिद्ध झालेले सफाई कर्मचारी, ज्यांना संजय दत्त जादूची झप्पी देतो. 


या कलाकाराचं नाव म्हणजे सुरेंद्र राजन. गेल्या ४ वर्षांपासून सुरेंद्र राजन स्वतःचं घर सोडून हिमालयात राहतायत. उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमधील खुन्न गावात राहतायत. दगडापासून बनलेल्या घराला त्यांनी आसरा बनवला आहे. हे घर राजन यांनी एका निवृत्त भारतीय जवानाकडून घेतलं आहे. हा जवान या घरात चहाचं दुकान चालवत असे. १७ किमी डोंगरावरून खाली उतरत या ठिकाणाहून गावात जाता येतं. त्यामुळे ३-४ महिन्यांमधून एकदा खाली उतरत तेल, साबण आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेऊन जातात. 


पिण्याच्या पाण्याची व्यवस्था डोंगरातून फुटलेल्या झऱ्यांमधून होते. ७० हून अधिक चित्रपटात काम करणाऱ्या सुरेंद्र राजन यांची चित्रकार आणि फोटोग्राफर अशीही ओळख आहे. त्यांना भटकंती आणि भ्रमंतीचा शौक आहे. देशातील कानाकोपऱ्यासह हंगेरी, ऑस्ट्रियाची सफर त्यांनी केली आहे. फिरण्याच्या या आवडीमुळे १६ वर्षे राजन यांनी भाड्याचे घरही घेतलं नव्हतं. कारमध्ये बसूनच त्यांनी देशभर भ्रमंती केली. लोकांना आपलं असं जगणं विचित्र वाटतं, मात्र पैशांच्या मागे आपण कधीही धावलो नाही असं ते सांगतात. करिअर वगैरे अशा कल्पनांवर विश्वास नसल्याचंही ते सांगतात. निसर्गाच्या सान्निध्यात साहसी धाडसी जगणं, भटकंती करणं यातून आपल्याला आनंद मिळतो हे सांगायलाही ते विसरत नाहीत. 
 

Web Title: Actor Surendra Rajan from Munnabhai MBBS liviing in Himalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.