Actor Sanjay Dutt Wife Manyata Dutt Release Official Statement After Actor Diagnosed with lung cancer | संजू पूर्वीपासूनच लढाऊ वृत्तीचा आहे; ही वेळही निघून जाईल- मान्यता दत्त

संजू पूर्वीपासूनच लढाऊ वृत्तीचा आहे; ही वेळही निघून जाईल- मान्यता दत्त

मुंबई : अभिनेता संजय दत्तचा फुफ्फुसांच्या कर्करोग अ‍ॅडव्हान्स स्टेजमध्ये असल्याचे समजते. संजय दत्तची पत्नी मान्यता लॉकडाऊनपासून दोन्ही मुलांसोबत दुबईत अडकली होती. पण त्याच्या आजाराबाबत समजताच ती मंगळवारी रात्री मुंबईत पोहोचली आहे. तिने निवेदन जारी केले आहे. संजू पूर्वीपासूनच लढाऊ वृत्तीचा आहे, ही वेळही निघून जाईल, असे तिने यात म्हटले आहे.

मान्यताने संजयच्या आजाराबाबत काहीही सांगितलेले नाही. मात्र, संजयचा ‘फायटर’ म्हणून उल्लेख केला आहे. तिने निवेदनात म्हटले आहे की, संजूच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांची आवश्यकता आहे. या कुटुंबाने यापूर्वी खूप काही सहन केले आहे, परंतु मला खात्री आहे, ही वेळही निघून जाईल. आपणा सर्वांना माझी विनंती आहे , संजूच्या चाहत्यांच्या कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये. आम्हाला मदत करा आणि आपले प्रेम असेच कायम ठेवा. संजू कायमच लढाऊ वृत्तीचा आहे. आणि म्हणून आमचे कुटुंब प्रत्येक कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरे गेले आहे. दरम्यान, लवकरच संजय दत्त अमेरिकेत किंवा सिंगापूर येथे उपचारांसाठी रवाना होणार असल्याचे समजते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actor Sanjay Dutt Wife Manyata Dutt Release Official Statement After Actor Diagnosed with lung cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.