ठळक मुद्देरणवीरकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. टोयोटा लँड क्रूजर, ऑडी क्यू 5, मारती सीयाज,  एस्टन मार्टिन रॅपिड एस या गाड्या त्याच्याकडे आहे.

आपल्या बिनधास्त अंदाजासाठी आणि ड्रेसिंग स्टाइलसाठीही ओळखला जाणारा अभिनेता  रणवीर सिंग याला कपड्यांसोबता लक्झरी कार कलेक्शनचीही आवड आहे. त्यामुळे त्याच्याकडे अनेक लक्झरी कार्सचे कलेक्शन आहे. आता त्याच्या कलेक्शनमध्ये एक नवी अलिशान गाडी दाखल झाली आहे. होय, रणवीरने नुकतीन 3 कोटी रूपये किमतीची Lamborghini Urus ही अलिशान कार खरेदी केली. गुरुवारी रणवीर आपल्या या नव्या को-या गाडीतून मुंबईच्या रस्त्यावर सैर करताना दिसला.

रणवीरकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. टोयोटा लँड क्रूजर, ऑडी क्यू 5, मारती सीयाज,  एस्टन मार्टिन रॅपिड एस या गाड्या त्याच्याकडे आहे.

८६ लाख रुपये किंमत असलेली टोयोटा लँड क्रूजर ही कार फार चालवत नाही. पण त्याच्या कलेक्शनमध्ये ही कार आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीला त्याने ही कार खरेदी केली होती. आॅडी क्यू ५ या कारचाही रणवीरकडे असलेल्या कार कलेक्शनमध्ये समावेश आहे. या कारची किंमत ५५ लाख रुपये आहे.

मारूतिची सीयाज ही कार रणवीर सिंगकडे सुद्धा आहे. या कारचा तो ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर होता. त्यामुळे ही कार त्याला गिफ्ट मिळाली होती.  एस्टन मार्टिन रॅपिड एस त्याच्या कलेक्शनमधील  सर्वात फेवरेट कार आहे. रणवीरने ही साडे तीन कोटी रुपयांची कार आपल्या वाढदिवसाला स्वत:ला गिफ्ट केली होती. मर्सिडीज बेंज जीएल क्लास ही कारही रणवीरच्या आवडत्या कारपैकी एक आहे.  रणवीर जगुआर एक्सजेएल ही कार अनेकदा वापरतो. 


Web Title: actor ranveer singh buys a whopping rs 3 crore luxury car lamborghini photos-viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.