actor prabhas donated 4 crores to fight with corona virus-ram | याला म्हणतात खरा हिरो....! प्रभासने कोरोनाग्रस्तांनासाठी दिले 4 कोटी

याला म्हणतात खरा हिरो....! प्रभासने कोरोनाग्रस्तांनासाठी दिले 4 कोटी

ठळक मुद्देआत्तापर्यंत अनेक साऊथ स्टार्सनी कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे .

कोरोना व्हायरसमुळे अख्खा देश लॉकडाऊन आहे. 21 दिवसांचे लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरस या दोन्हींशी लढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पण या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे, हेही तितकेच सत्य आहे. अशात देशातील अनेक उद्योगपती व फिल्मी स्टार्स मदतीसाठी समोर आले आहेत. आता या यादीत साऊथ सुपरस्टार प्रभासचेही नाव समाविष्ट झाले आहे.
 ‘बाहुबली’ या चित्रपटानंतर जगभरातील चाहत्यांना वेड लावणा-या प्रभासने कोरोनाशी लढण्यासाठी एकूण4 कोटी रूपयांची मदत दिली आहे.

प्रभास सध्या स्वत: सुद्धा होम क्वारंटाईनमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच प्रभास त्याच्या सिनेमाचे शूटिंग संपवून परदेशातून भारतात परतला आहे.  त्यामुळे खबरदारी म्हणून त्याने स्वत:ला घरात बंद करुन घेतले आहे. मात्र यादरम्यान सामाजिक भान ठेवत त्याने कोरोनाग्रस्तांसाठी 3 कोटी पंतप्रधान मदत निधीत दान केले. शिवाय आंध्रप्रदेश आणि तेलंगणा मुख्यमंत्री मदत निधीसाठी प्रत्येकी 50 लाख रूपयांची मदत दिली. म्हणजेच प्रभासने कोरोनाग्रस्तांसाठी एकूण 4 कोटी रुपये दान केले आहेत.

प्रभास गेल्या काही दिवसांपासून ‘प्रभास 20’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी होता. जॉर्जियात या सिनेमाचे शूटींग सुरु होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच प्रभास जॉर्जियामधून भारतात परतला. येथून परतल्यानंतर प्रभासने स्वत:ला 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन केले आहे. प्रभासच्या  ‘प्रभास 20’ या सिनेमात तो पूजा हेगडेसोबत दिसणार आहे.

आत्तापर्यंत अनेक साऊथ स्टार्सनी कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे .सुपरस्टार रजनीकांत यांनी 50 लाखांची मदत केली आहे. साउथ स्टार पवन कल्याणने 2 कोटी, त्याचा भाचा व अभिनेता रामचरणने 70 लाख, रामचरणचे वडील व तेलगू सुपरस्टार चिरंजीवी यांनी 1 कोटी आणि  महेश बाबू याने1 कोटी रुपये मदत निधीमध्ये दान केले आहेत.

Web Title: actor prabhas donated 4 crores to fight with corona virus-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.