आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकलेला अभिनेता म्हणजे रणदीप हुड्डा. विमान कंपनीत काम करणारा रणदीप ते आजचा स्टार अभिनेता रणदीप हुड्डा असा मोठा यशस्वी आणि खडतर प्रवास रणदीपने पार केला आहे. यशस्वी अभिनेता म्हणून नावारुपाला येत असतानाच त्याच्या अफेअर आणि लिंक अपच्या चर्चाही तितक्याच रंगल्या. विविध अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडलं गेलं. अभिनेत्री अदिती राव हैदरी, चित्रांगदा सिंह आणि लीसा हेडन यांच्याशी रणदीपचे नाव जोडलं गेलं. याशिवाय दोन वर्षे त्याने सुष्मिता सेनला डेट केलं होतं. यानंतर नीतू चंद्रासोबतही तो रिलेशनशिपमध्ये होता. अफेअरशिवाय रणदीप त्याच्या बोल्ड सीनमुळेही चर्चेत राहतो. 

दोनवेळा तर त्याच्या चित्रपाटाचे बोल्ड इंटिमेट सीन लीक झाले होते. प्रसिद्ध छायाचित्रकार राजा रवी वर्मा यांच्या आयुष्यावर रंगरसिया चित्रपटातील अनेक बोल्ड सीन लीक झाले होते. या सीनमुळे हा चित्रपट तुफान चर्चेत आला होता. याशिवाय त्याच्या साहेब बीवी और गँगस्टर चित्रपटातील अभिनेत्री माही गिलसोबतचाही बोल्ड सीनही लीक झाला होता.

'मान्सून वेडिंग' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एंट्री करणाऱ्या रणदीपला वन्स अपॉन टाइम इन मुंबई या चित्रपटातून खरी ओळख लाभली. यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही. हायवे, सरबजीत, सुल्तान, बागी अशा चित्रपटात रणदीपने दमदार भूमिका साकारल्या. याशिवाय सुरूवातीच्या काळात रणदीपने मॉडेलिंग आणि दिल्लीत थिएटर क्षेत्रातही नशीब आजमावलं होतं. 


Web Title: This Actor in news because of sex scene, many scene leaked on internet
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.