actor kamaal r khan tweets about his son Faisal Khan car accident | या वादग्रस्त अभिनेत्याच्या मुलाने केला अपघात, आता मागतोय ऑडी आर 8 किंवा रेंज रोव्हर!!

या वादग्रस्त अभिनेत्याच्या मुलाने केला अपघात, आता मागतोय ऑडी आर 8 किंवा रेंज रोव्हर!!

ठळक मुद्देकेआरके आणि वाद यांचे खूपच जवळचे नाते आहे.

बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान अर्थात केआरके त्याच्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असतो. सध्या अशाच एका ट्विटमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. होय, केआरकेने एक व्हिडीओ शेअर करत, त्याच्या मुलाने कारला अपघात केल्याची माहिती शेअर केली. या अपघातात केआरकेच्या मुलाला कुठलीही दुखापत झाली नाही. पण त्याच्या बीएमडब्ल्यू कारचे मात्र बरेच नुकसान झाले.
केआरकेने एक व्हिडिओ शेअर करत, त्याच्या  मुलाने कारला अपघात केल्याची माहिती दिली. एकापाठोपाठ एक असे दोन ट्विट त्याने केलेत. 
‘माझ्या मुलाने कारचा अपघात केला आहे’,असे त्याने पहिल्या ट्विटमध्ये सांगितले. सोबत एक व्हिडिओही शेअर केला. ‘फैजल (केआरकेचा मुलगा) ऑफिसला जात होता आणि त्याने गाडीचा अपघात केला. गाडीचा अगदी  उत्तम प्रकारे त्याने अपघात केला आहे. पण ठिक आहे हरकत नाही,’असे केआरके या व्हिडिओत सांगतोय.
 ‘कार अपघातामुळे फैसलला आता बीएमडब्ल्यू कार चालवायची इच्छा नाही. आता फैजल ऑडी आर 8 किंवा रेंज रोव्हरची मागणी करत आहे,’असे दुसरे ट्विट त्याने केले आहे.


विशेष म्हणजे,  ऑडी आर 8 आणि रेंजरोव्हरपैकी कोणती चांगली आहे, याबद्दल त्याने लोकांच्या प्रतिक्रिया मागितल्या आहेत. अभिनेता कमाल आर खानने ‘देशद्रोही’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. यानंतर  ‘बिग बॉस3’ मध्ये तो सहभागी झाला.  केआरके आणि वाद यांचे खूपच जवळचे नाते आहे. ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याचे नेहमीच कोणा ना कोणासोबत वाद होत असतात. आक्षेपार्ह ट्वीट करणे, ट्वीटच्या माध्यमातून उगाचच सगळ्यांसोबत पंगा घेणे ही केआरकेची खूप जुनी सवय आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: actor kamaal r khan tweets about his son Faisal Khan car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.