ठळक मुद्देसलीम खान यांच्यासोबत लग्न करण्याआधी दिग्दर्शक पीएन अरोरा यांच्यासोबत हेलन यांचे लग्न झाले होते. ते हेलन यांच्यापेक्षा वयाने बरेच मोठे होते.

हेलन यांनी बॉलिवूडमधील एक काळ गाजवला होता असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. त्यांच्या सौंदर्यावर, नृत्यावर लोक अक्षरशः फिदा झाले होते. मेरा नाम चीन चीन चूँ, पिया तू अब तो आजा, मुंगडा ही त्यांच्यावर चित्रीत झालेली गाणी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. हेलेन यांचे लग्न ज्येष्ठ लेखक सलीम खान यांच्यासोबत झाले असून त्यांना अनेकवेळा त्यांच्या कुटुंबियांसह सार्वजनिक ठिकाणी पाहायला मिळते. 

सलीम खान यांच्या आयुष्यात हेलन आल्या, त्यावेळी त्यांचे लग्न सलमा खान यांच्यासोबत झाले होते आणि त्यांना सलमान, अरबाज, सोहेल आणि अल्वीरा ही मुले होती. सलीम खान आणि सलमा खान यांचा प्रेमविवाह झाला होता. सलमा खान यांचे लग्नाआधी नाव सुशीला चरक होते. त्या दोघांनी पाच वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न केले. सलीम खान आणि सलमा खान यांच्या आयुष्यात सगळे काही सुरळीत सुरू असताना हेलेन यांच्यासोबत सलीम खान यांची मैत्री झाली. त्यांना काही चित्रपट मिळवून देण्यासाठी देखील त्यांनी मदत केली. या मैत्रीचे काहीच वर्षांत प्रेमात रूपांतर झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सलीम खान यांनी हेलन यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने सलमा खान यांचा मानसिक धक्का बसला होता. त्यांच्या मुलांनी देखील हेलन यांना सुरुवातीला स्वीकारले नव्हते. पण कालांतराने त्यांच्या सगळ्यात खूप चांगले बॉण्डिंग निर्माण झाले. 

सलीम खान यांच्यासोबत लग्न करण्याआधी दिग्दर्शक पीएन अरोरा यांच्यासोबत हेलन यांचे लग्न झाले होते. ते हेलन यांच्यापेक्षा वयाने बरेच मोठे होते. लग्नानंतर काहीच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. यामुळे हेलन नैराश्यात गेल्या होत्या. त्याचदरम्यान काबली खान या चित्रपटाच्या सेटवर 1962 मध्ये सलीन खान यांच्यासोबत त्यांची ओळख झाली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actor Helen was married to director PN Arora before married to salim khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.