अभिनेता फरहान अख्तर सध्या राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा आगामी तूफान सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. तूफान सिनेमाच्या शूटिंग दरम्यान फरहानच्या हाताला हेयरलाईन फ्रॅक्चर झाले आहे. फरहानने इन्स्टाग्रामवर एक्स-रेचा फोटो शेअर करत ही माहिती आपल्या फॅन्सना दिली. फ्रॅक्चर झाल्यामुळे फरहानने आता शूटिंगमध्ये ब्रेक घेतला असेल यात काही शंका नाही. 

     
सहा वर्षानंतर फरहान राकेश ओमप्रकाश मेहरांसोबत काम करतो आहे. याआधी 'भाग मिल्खा भाग' सिनेमात दोघे एकत्र आले होते. तूफानमध्ये फरहान एका बॉक्सरची भूमिका साकारणार आहे. गेल्या शुक्रवारी फरहानचा द स्काय ईज पिंक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमातील फरहानने साकारलेली वडिलांची भूमिका सगळ्यांना आवडली आहे. यात फरहानसह प्रियंका चोप्रा आणि जायरा वसिम यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत. 


फरहान आपल्या पर्सनल लाईफला घेऊनही चर्चेत आहे.  सध्या फरहान शिबानी दांडेकरला डेट करतो आहे. त्या दोघांच्या नात्याबद्दलचा खुलासा त्याने सोशल मीडियावर केला आहे. फरहान आतापर्यंत त्याच्या घटस्फोटाबद्दल बोलला नव्हता. द स्काय इज पिंकच्या प्रमोशनदरम्यान त्याने पिंकव्हिलाशी बोलताना त्याबद्दल खुलासा केला.  

फरहानला जेव्हा विचारण्यात आलं की तुझ्या मुलांना घटस्फोट घेत असल्याचं सांगणं किती कठीण गेलं, त्यावर त्याने सांगितलं की, कोणतीच गोष्ट सोप्पी नव्हती. आपल्या मुलांना नाही ऐकायचंय त्या गोष्टी सांगणं शक्य नसते. ज्या गोष्टी आपली मुलांना आपल्याकडून अपेक्षित असतात आणि आपल्याकडून होत असल्याचं पहायचं असते. तुम्हाला समजतं की तुम्ही त्यांच्याकडून कोणत्या गोष्टींची अपेक्षा ठेवत आहात.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actor farhan akhar gets injured while shooting for toofan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.