अनेकदा सिनेमात अभिनेते  काळजाचे ठोके चुकवणारे स्टंट करताना दिसतात. भूमिकेची गरज म्हणून कलाकार जीवघेणे स्टंट करताना दिसतात. मात्र स्टंट करणे कधी कधी कलाकारांची जीवाशीही येते आणि गंभीर दुखापतीच्या घटना घडतात. मल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता फहद फासिलला अशाच प्रकारचे स्टंट करणे चांगलेच महागात पडले आहे. आपल्या सिनेमासाठी स्वतः स्टंट करण्यावर फहदचा भर असतो.

त्यामुळं  आगामी  'मलयानकुंजू' सिनेमाच्या एका सीनसाठी उंचावरून उडी मारायची असा सीन त्याला करायचा होता. मात्र सीन  करताना त्याचा तोल गेला आणि फहद खाली पडला. त्याच्या नाकाला जबर दुखापत झाली आहे. या दुर्घटनेनंतर फहदला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यामुळे आता डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. 

शूटिंगच्या वेळी सेटवर झालेल्या अपघातात फहदच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आहे.  अखेरच्या क्षणी दुखणं वाढल्यानं आणि वेळ दवडणं शक्य नसल्यानं त्याच्या चेह-यावर सर्जरीही करण्यात आली आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर फहदला काही महिने सक्तीची विश्रांती घेणं आवश्यक आहे.

 

या विश्रांतीनंतरच तो त्याच्या कामाला सुरुवात करु शकतो अन्यथा नाकाचं हे दुखणं वाढण्याची शक्यता आहे... या सक्तीच्या विश्रांतीनंतरच तो त्याच्या कामाला पुन्हा सुरुवात करु शकतो. तोपर्यंत काही दिवस आत त्याला स्वतःच्या आरोग्याची निट काळजी घ्यावी लागणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actor Fahadh Faasil injured In An accident while shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.