actor ashutosh rana tests positive for coronavirus a week after taking first jab of covid 19 vaccine | आशुतोष राणा कोरोना पॉझिटीव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

आशुतोष राणा कोरोना पॉझिटीव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

ठळक मुद्देगेल्या 6 एप्रिलला आशुतोषने पत्नी रेणुका शहाणेसोबत कोरोना लसीचा पहिला डोज घेतला होता.

कोरोनामुळे (Corona Virus) देशभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. राज्यात संचारबंदीची घोषण झालीय. देशपातळीवरही लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाभोवतीच कोरोनाचा विळखा घट्ट होतोय. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटींना गेल्या काही दिवसांत कोरोनाची लागण झाली. आता बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता आशुतोष राणा (Ashutosh Rana) यालाही कोरोनाने गाठले आहे.  (actor ashutosh rana tests positive for coronavirus)
काही दिवसांपूर्वीच आशुतोषने कोरोना लसीचा पहिला डोज घेतला होता. याऊपरही तो कोरोनाचा शिकार ठरला.
आशुतोषने स्वत: सोशल मीडियावर कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.

एक हसरा फोटो शेअर करत, त्याने ही माहिती शेअर केली. या फोटोसोबत त्याने लिहिले, ‘आपले शरीर एका दुर्गासमान असते.यात नऊ द्वार असतात. याठिकाणी असलेली परमचेतना, रक्षण करणा-या शक्तीला दुर्गा म्हटले जाते. आज भारतीय नववर्षाची सुरूवात आहे. याला चैत्र नवरात्री असेही म्हटले जाते. आजपासून नऊ दिवस भारतात जगतजननी दुर्गेचे पूजन होते. या अत्यंत शुभदिनी तुम्हाला तुमच्या शरीरातील एका विकाराबद्दल माहिती मिळत असेल तर, यासारखे शुभ काहीही नाही. मला आजच कळले की, मी कोरोना पॉझिटीव्ह आहे. मी तात्काळ या आजारातून मुक्त होण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केलेत. मी लवकरच बरा होईल, असा विश्वास व्यक्त करतो,’ असे आशुतोषने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
आशुतोष राणाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. चाहत्यांनी राणा लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना सुरु केली आहे.
गेल्या 6 एप्रिलला आशुतोषने पत्नी रेणुका शहाणेसोबत कोरोना लसीचा पहिला डोज घेतला होता. रेणुकाने तिच्या अधिकृत इन्स्टा अकाऊंटवर याची माहिती दिली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: actor ashutosh rana tests positive for coronavirus a week after taking first jab of covid 19 vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.